कराड छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या १४९ व्या जयंतीनिमीत्त आज कराड येथे शाहू चौकातील त्यांच्या पुतळ्यास राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री मा.आमदार बाळासाहेब पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

कराड छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या १४९ व्या जयंतीनिमीत्त आज कराड येथे शाहू चौकातील त्यांच्या पुतळ्यास राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री मा.आमदार बाळासाहेब पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील, कराड लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील(काका), कराड पंचायत समितीचे माजी सभापती प्रणव ताटे, लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, गंगाधर जाधव, जयंत बेडेकर, शिवाजी पवार, उदय हिंगमीरे, पोपटराव साळुंखे, दादासो शिंगण, सतीष भोंगाळे, सचिन पवार, समाधान चव्हाण, बाबासाहेब कळके, मोहसीन अंबेकरी, अजय सुर्यवंशी, मंगेश वास्के, रविंद्र मुंढेकर, निखिल ठोंबरे, राकेश पवार, निलेश झेंडे, भारत थोरवडे, शोएब सुतार, अधिकराव जाधव, भारत जाधव, जाबिर वायकर, राहुल भोसले तसेच इतर पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

यावेळी आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले की, राज्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांची जयंती मोठया उत्साहात साजरी केली जात आहे, महाराष्ट्राला समतेचा  विचार त्यांनी दिला.सर्व जातीधर्माला, समाजाला बरोबर घेऊन जाण्याची भूमिका त्यांची होती, आदर्श राजे म्हणून त्यांनी काम केले, त्यांच्या विचारांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने राज्याच्या कारभाराची घौडदौड सुरू राहणे अपेक्षित आहे. आज कराड शहर परिसरामध्ये त्यांना जयंतीदिनी अभिवादन केले.

Comments

Popular posts from this blog

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी

कराड पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी ग्रामविकास मंत्री सकारात्मक

कराड राज्य उत्पादन शुल्कचा जवान लाचलुचपतच्या जाळ्यात