कराड दक्षिण साठी आ. पृथ्वीराज चव्हाण हाच एकमेव योग्य चेहरा : डॉ. इंद्रजित मोहिते
कराड दक्षिण साठी आ. पृथ्वीराज चव्हाण हाच एकमेव योग्य चेहरा : डॉ. इंद्रजित मोहिते वडगाव हवेली येथे आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारार्थ मोहिते गटाचा कार्यकर्ता मेळावा कराड, प्रतिनिधी : विधानसभेत जाणारा माणूस हा कोणाचाही हस्तक नसावा. तो कोणाचा चापलुस नसावा. तो स्वतंत्र व स्वतः च्या बुध्दीने आपल्या मतदारसंघाचे विचार मांडण्याची क्षमता, वक्तृत्व व अभ्यासू असावा. याकरिता मला पृथ्वीराज बाबांपेक्षा दुसरा कोणताही श्रेष्ठ उमेदवार दिसत नाही. कराड दक्षिणेचा खऱ्या अर्थाने उर्वरित विकास साधण्यासाठी आ. पृथ्वीराज चव्हाण हे एकमेव योग्य चेहरा आहेत. असे मत भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांनी व्यक्त केले. वडगाव हवेली (ता. कराड) येथे राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारार्थ डॉ. इंद्रजित मोहिते गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. सर्जेराव थोरात अध्यक्षस्थानी होते. उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण, अॅ ड. उदयसिंह पाटील - उंडाळकर, प्रा. धनाजी काटकर, शिवराज मोरे, राजेंद्र चव्हाण, रोहित पाटील, संभाजी ...