*आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन करावे**- जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी*
*आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन करावे*
*- जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी*
सातारा दि.14 (जिमाका) : महाराष्ट्र सार्वत्रिक निवडणूक-2024 अनुषंगाने दि. 15 ऑक्टोंबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केलेली आहे. आदर्श आचारसंहितेचे सातारा जिल्ह्यातील 8 ही विधानसभा मतदार संघात अंमलबजावणी करण्यात येणार आहेत. या आचार संहितेचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
निवडणूक वेळापत्रक पुढील प्रमाणे : निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करणे मंगळवार दि. 22 ऑक्टोंबर, नामनिर्देशन दाखल करण्याचा अंतिम दिनांक मंगळवार दि. 29 ऑक्टोंबर, उमेदवारी अर्ज छाननी बुधवार दि. 30 ऑक्टोंबर, उमेदवारी अर्ज माघारी घेणे सोमवार दि. 4 नोव्हेंबर, प्रत्यक्ष मतदान बुधवार दि. 20 नोव्हेंबर व मतमोजणी शनिवार दि. 23 नोव्हेंबर 2024.
15 ऑक्टोंबर 2024 ची मतदार स्थिती पुढील प्रमाणे : फलटण (अनुसूचित जाती राखीव पुरुष- 172459- महिला-165991, तृतीय पंथी-14 एकूण 3 लाख 38 हजार 464, वाई पुरुष – 173228, महिला-172798, तृतीय पंथी- 7 एकूण- 3 लाख 46 हजार 33, कोरेगाव पुरुष – 161720, महिला-157068, तृतीय पंथी- 3 एकूण- 3 लाख 18 हजार 791, माण पुरुष – 183101, महिला-174731, तृतीय पंथी- 9 एकूण- एकूण 3 लाख 57 हजार 841, कराड उत्तर पुरुष – 154747, महिला-150019, तृतीय पंथी- 7 एकूण- एकूण 3 लाख 4 हजार 773, कराड दक्षीणत पुरुष – 159077, महिला-154171, तृतीय पंथी- 32 एकूण- 3 लाख 13 हजार 280, पाटण पुरुष – 156100, महिला-152251, तृतीय पंथी- 3 एकूण- एकूण 3 लाख 8 हजार 354, सातारा पुरुष – 170822, महिला-170476, तृतीय पंथी- 37 एकूण- 3 लाख 41 हजार 335 असे एकूण जिल्ह्यात 13 लाख 31 हजार 254 पुरुष तर महिला 12 लाख 97 हजार 505 तर तृतीय पंथीय 112 एकूण 26 लाख 28 हजार 871 मतदार आहेत.
महिला कर्मचारी यांच्याद्वारे संचलित एकूण 16 मतदान केंद्र, दिव्यांगाद्वारे संचलीत एकूण 8 मतदान केंद्रे आणि तरुण संचलित मतदान केंद्र एकूण 16 आहेत. सदर मतदान केंद्रांची विधानसभा निहाय निश्चिती करण्यात आलेली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात टोल फ्री क्रमांक 1950 वर तक्रार निवारण कक्षातील 24 तास कॉल सेन्टर चालू झालेले आहे. टोल फ्री कॉल नंबर 1950 वर फोन करुन निवडणुकी संदर्भात तक्रार नोंदविता येऊ शकते. आजपासून जिल्हयात आदर्श आचारसंहितेचे पालन सुरु झाले असून सार्वजनिक ठिकाणी असणारे पोस्टर्स बॅनर हटविण्याची कार्यवाही सुरु करणेत आलेली आहे. सर्व राजकीय पक्ष व उमेदवार यांना आदर्श आचारसंहितेचे पालन करणेचे आवाहन करण्यात येत आहे.
सातारा जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांसाठी त्यांचे घरापासून ते मतदार केंद्रापर्यंत मतदान करण्यासाठी वाहन व्यवस्था करणेत आलेली आहे. तसेच प्रत्येक केंद्रावर दिव्यांगांसाठी रॅम्पची व व्हील चेअरची व्यवस्था करणेत आलेली आहे. तसेच 85 वर्षावरील जेष्ठ नागरिक मतदारांना घरुन मतदान करणेची सुविधा उपलब्ध करुन देणेत येईल.
निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेबाबत माहिती देताना पोलीस अधीक्षक समीर शेख म्हणाले, सातारा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी ग्रामीण व शहरी भागात एकूण 3 हजार 165 मतदान केंद्र आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुरक्षा अबाधित राहण्यासाठी 165 सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, 3 हजार 573 पोलीस, 3 हजार 471 होमगार्ड, 6 राज्य राखीव पोलीस बल कंपनी, 4 केंद्रीय निमलष्करी बल कंपनी इतक्या मनुष्यबळाचा वापर करण्यात येणार आहे. एरीया डॉमीनेशन व रुट मार्च करीता 18 ऑक्टोबर रोजीपासून सीमा सुरक्षा बलाच्या 2 कंपनी उपलब्ध होणार आहेत. निवडणूक कालावधीत कायदा व सुरक्षा अबाधित राहण्याकरीता मतदान केंद्र, परिसर आदी बंदोबस्ताशिवाय पोलीस सेक्टर पेट्रोलिंगचे नियेाजन करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यात मतदान संघ निहाय एकूण 143 पोलीस क्षेत्रीय पेट्रोलिंगचे नियोजन करण्यात येणार आहे. निवडणूक शांततेत भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी जिल्ह्यात राजकीय, जातीय संवेदनशील गावांमध्ये तसेच मोठ्या बाजारपेठेमध्ये 98 ठिकाणी रुट मार्च, 52 ठिकाणी एरीया डॉमीनेशन व 5 फ्लॅग मार्चचे नियोजन करण्यात आलेले आहे, असेही ते म्हणाले.
पोलीस अधीक्षक समीर शेख म्हणाले, जिल्ह्यात 3 हजार 228 शस्त्र परवानाधारक असून 3 हजार 346 इतकी शस्त्रसंख्या आहे. स्वखुशीने शस्त्र जमा करणाऱ्याची संख्या 2 हजार 692 असून जिल्हाधिकारी यांचेकडून नोटीस प्राप्त करणे आवश्यक असलेल्यांची शस्त्रसंख्या 315 इतकी शस्त्रसंख्या आहे. जिल्ह्यात एकूण 5 हजार 111 जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे. निवडणूक शांततेत व कायदा सुव्यवस्थेचे पालन कोटेकारपणे व्हावे यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.
00000
Comments
Post a Comment