दिवाळी अंकातून मिळणारे ज्ञान,संस्कार सर्वांसाठी प्रेरणादायी.* *पृथ्वीक प्रताप*

*दिवाळी अंकातून मिळणारे ज्ञान,संस्कार सर्वांसाठी प्रेरणादायी.*            *पृथ्वीक प्रताप*
कराड:-विद्यानगर सैदापूर येथील समाजभूषण बाबुराव गोखले ग्रंथालयात दिवाळी अंकांचे उद्घाटन महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम विनोदी अभिनेता पृथ्वीक प्रताप यांच्या हस्ते झाले यावेळी बोलताना ते म्हणाले, "दिवाळी अंक हा दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करणारा एक महत्त्वाचा घटक आहे. कथा, कविता, वैचारिक लेख,ऐतिहासिक माहिती,गड-किल्ले,आरोग्य, अर्थ,सामान्य ज्ञान,पाककला समोर ठेवून या अंकांची केलेली निर्मिती हा एक महत्त्वाचा वार्षिक दस्तऐवज आहे. मराठी वाचकांची अभिरुची संपन्न करण्यामध्ये मोलाचे योगदान दिवाळी अंक दरवर्षी वाचकांना देत असतात. हजारो  वर्षाचा अज्ञानाचा काळोख दिवाळी अंकांच्या प्रकाश किरणांनी नाहिसा होतो. या शब्दांच्या प्रकाशांनी अनेकांच्या आयुष्यात प्रेरणादायी प्रकाश निर्माण होतो.  यावर्षीचे दिवाळी अंक वाचकांसाठी पर्वणी ठरावी.  दिवाळी अंकातून मिळणारे ज्ञान, संस्कार सर्वांसाठी प्रेरणादायी असतात."         यावेळी प्रा. दादाराम साळुंखे म्हणाले. "यावर्षी ग्रंथालयाने वाचकांसाठी दीडशे रुपयात शंभर दिवाळी अंक वाचण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यातून सर्वश्रेष्ठ दिवाळी अंक वाचक स्पर्धा ही आयोजित केली जाणार आहे.त्यातून तीन क्रमांक काढले जाणार आहेत. तरी याचा फायदा सर्वांनी घ्यावा."
       यावेळी ग्रंथालयाच्या अध्यक्षा सौ.कांचन धर्मे,अभिजित इंगळे,विवेकानंद मुळे,प्रा.पल्लवी निकम, ग्रंथपाल रुक्साना नदाफ,
आभार सीमा कांबळे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त