श्री दैत्यनिवारणी मंदिराच्या संरक्षण भिंतीसाठी डॉ. अतुल भोसलेंच्या प्रयत्नातून ५ कोटींचा निधी मंजूर

श्री दैत्यनिवारणी मंदिराच्या संरक्षण भिंतीसाठी डॉ. अतुल भोसलेंच्या प्रयत्नातून ५ कोटींचा निधी मंजूर

कराड, ता. कराड वार्ता सह्याद्री वार्ता समूह
१६ : कराड नगरीचे ग्रामदैवत असलेल्या श्री दैत्यनिवारणी मंदिराच्या संरक्षण भिंतीसाठी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांतून ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याबाबतचा शासन आदेश १४ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाला असून, मंदिराच्या संरक्षणाच्या दृष्टीने हा निर्णय महत्वपूर्ण समजला जात आहे.

कमलालक्ष्मीचे निवास्थान म्हणून पुराणात कराडचा उल्लेख आहे. कराड शहराच्या पश्चिमेस कोयना नदीकाठी श्री दैत्यनिवारणी देवीचे मंदिर आहे. दैत्यांचा नाश करणाऱ्या श्री दैत्यनिवारणी देवीची अष्टभूजा मूर्ती असून, याठिकाणी दरवर्षी नवरात्रीत मोठा उत्सव साजरा केला जातो. नदीकाठी असलेल्या या मंदिराच्या परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षक भिंत उभारण्याची मागणी अनेक दिवसांपासून भाविक व कराडवासीयांमधून होत होती. 

याबाबत भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करत, भाविकांची ही मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडली होती. या मागणीची दखल घेत, महायुती सरकारने ‘नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात नागरी सेवा व सुविधेची कामे करणे’ या योजनेअंतर्गत श्री दैत्यनिवारणी मंदिराच्या संरक्षण भिंतीसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याबाबतचा शासन आदेश १४ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाला असून, मंदिराच्या संरक्षणाच्या दृष्टीने हा निर्णय महत्वपूर्ण समजला जात आहे.

कराडच्या ऐतिहासिक श्री दैत्यनिवारणी मंदिराच्या संरक्षक भिंतीसाठी शासनाच्या माध्यमातून भरघोस निधी प्राप्त झाल्याने, मंदिराची सुरक्षितता जपण्यास मदत होणार आहे. या निधीबद्दल महायुती सरकारचे आणि डॉ. अतुल भोसले यांचे कराडवासीयांमधून आभार व्यक्त केले जात आहेत. 

सोबत फोटो : ना. देवेंद्र फडणवीस व डॉ. अतुल भोसले

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त