ग्रंथ माणसांना समृद्ध जीवनाची वाट दाखवतात* *मनोहर जाधव*
*ग्रंथ माणसांना समृद्ध जीवनाची वाट दाखवतात*
कराड:- विद्यानगर येथील समाजभूषण बाबुराव गोखले ग्रंथालय ग्रंथालयाला माजी मुख्याध्यापक मनोहर जाधव आणि मुख्याध्यापिका सुनीता जाधव यांनी ग्रंथ भेट दिली. यावेळी बोलताना मनोहर जाधव म्हणाले ग्रंथांच्या माध्यमातून समाजावर संस्कार होतात आणि त्यातून समाज नवनिर्मितीचे स्वप्न पाहतो आधुनिक काळात वाचनाची आवड कमी झाली असली तरी अनेक विद्यार्थी, तरुण वर्ग वाचनाने समृद्ध होऊन वेगळ्या क्षेत्रामध्ये आपले करिअर घडवत आहेत त्यातून समाजाची सेवा करण्याची ध्येय त्यांच्यामध्ये निर्माण झाले आहे.ग्रंथ माणसांना प्रेरणा देणारे आणि समृद्ध जीवनाची वाट दाखवणारे असतात."
यावेळी सुनिता जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच ग्रंथालयाला भविष्यकाळात ग्रंथरुपी व आर्थिक मदत करण्याचा मनोदय व्यक्त केला. याप्रसंगी ग्रंथालयाचे संचालक अभिजित इंगळे, वाचकप्रेमी तसेच ग्रंथपाल रुक्साना नदाफ, सीमा कांबळे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.दादाराम साळुंखे यांनी केले. आभार रुक्साना नदाफ यांनी मानले
Comments
Post a Comment