माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वतीने कराड व मलकापूर येथे राबविण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात 3500 रुग्णांनी लाभ घेतला.*



 *माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वतीने कराड व मलकापूर येथे राबविण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात 3500 रुग्णांनी लाभ घेतला.*  

 *कराड वार्ता सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क
* : माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वतीने शहरी भागासाठी राबविण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात कराड व मलकापूर शहरातील जवळपास 3500 नागरिकांनी लाभ घेतला. या आरोग्य शिबिराचे उदघाटन माज़ी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, सातारा जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस राहुल चव्हाण, इंद्रजित चव्हाण, कराड दक्षिण युवक काँग्रेस अध्यक्ष दिग्विजय पाटील, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष ऋतुराज मोरे, अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, प्रशांत देशमुख,आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 

 *यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि,* राज्यातील जनतेला आरोग्य सेवा हि मोफत दिली गेली पाहिजे. यासाठी सरकारने धोरण राबविले पाहिजेत व यानुसार अर्थसंकल्पात तरतूद केली गेली पाहिजे. माझ्या मुख्यमंत्री कार्यकाळात राजीव गांधी जीवनदायी योजना हि दीड लाख रुपयापर्यंतची मोफत आरोग्य योजना सुरु करण्यात आली तसेच राज्यभर १०८ मोफत रुग्णवाहिका सेवा अशा प्रमुख योजना सुरु करता आल्या त्याचा लाभ अजूनही जनतेला मिळत आहे. आजपर्यंत लाखो रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतलेला आहे. कराड व मलकापूर शहरात आयोजित केलेली आरोग्य शिबिरे याचा नक्कीच नागरिकांना फायदा होईल. 

आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात हृदयरोग, मेंदूरोग, जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी, चेस्ट अँड रेस्पिरेटरी मेडिसिन, नाक, कान व घसा, दंतरोग, फिजिओथेरिपी, आयुर्वेद, होमिओपॅथी, हाडांचे विकार, युरॉलॉजी आणि लेफ्रॉलॉजि, स्त्री रोग, लहान मुलांचे आजार, गेस्ट्रोलॉजि, अन्कॉलॉजी, त्वचा विकार, डोळ्यांचे विकार आदीवर तंज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली गेली. हे आरोग्य शिबीर पूर्णपणे मोफत राबविण्यात आले असून कराड शहरातील नागरिकांना याचा लाभ मिळावा यासाठी आयोजित केले होते. शिबिराला नागरिकांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. असेच आरोग्य शिबीर मलकापूर शहरात सुद्धा आयोजित केले होते ते आरोग्य शिबीर तालुका वैद्यकीय विभाग अंतर्गत राबविण्यात आले होते. 

माजी  मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता असे आरोग्य शिबिरे जिल्हा परिषद गट निहाय आयोजित करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी माहिती दिली.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त