*आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून कराड दक्षिणेत १ कोटी ९० लाख ५० हजाराचा निधी उपलब्ध*

*आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून कराड दक्षिणेत १ कोटी ९० लाख ५० हजाराचा निधी उपलब्ध* 

 *कराड* कराड वार्ता सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क
: राज्यातील सरकार विरोधी पक्षांचे असतानाही राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात विकासकामांचा सिलसिला कायम राखला आहे. त्यांनी गेल्या पाच वर्षात सुरुवातीस कोरोनाचे संकट व नंतर राज्यात सत्ताबदल होवूनही कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी आणत आपल्या प्रत्यक्ष कृतीची प्रचिती इतरांना दिली आहे. याचाच एक भाग म्हणून त्यांनी मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी १ कोटी ९० लाख ५० हजार रुपयांचा निधी आणला आहे. या निधीची प्रशासकीय प्रतही मिळाली आहे.

मागील कालावधीत आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे राज्यस्तरीय अनुसूचित जाती व नवबौध्द घटक योजना २०२४ - २५ अंतर्गत विविध विकासकामांना निधी देण्याबाबत पत्रव्यवहार केला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबतचा अहवाल शासन दरबारी दिला. यास प्रशासकीय मान्यता मिळाली असून, यामधून मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी १ कोटी ९० लाख ५० हजाराचा निधी उपलब्ध झाला आहे.

उपलब्ध निधीतून होणारी विकासकामे व कंसात मिळालेला निधी असा ; समतानगर - येळगाव येथे आरसीसी गटार करणे (९ लाख ५० हजार रुपये), अहिल्यानगर - वहागाव येथे बंदिस्त गटार बांधणे (७ लाख रुपये), आंबेडकरनगर - येरवळे येथे आरसीसी गटार करणे (९ लाख ५० हजार रुपये), नाईकबा मंदिर वस्ती - आटके येथे रस्ता कॉंक्रीटीकरण करणे (९ लाख ५० हजार रुपये), आंबेडकरनगर - घोगाव येथे रस्ता कॉंक्रीटीकरण करणे (१० लाख रुपये), रोहिदासनगर - विंग येथे रस्ता कॉंक्रीटीकरण करणे (९ लाख ५० हजार रुपये), गणेशनगर बेघर वस्ती गोळेश्वर येथे बंदिस्त गटार व आरसीसी रस्ता करणे (९ लाख ५० हजार रुपये), सिद्धार्थनगर रेठरे खुर्द येथे रस्ता कॉंक्रीटीकरण करणे (८ लाख ५० हजार रुपये), कृष्णा कॅनॉल सैदापूर येथील रस्ता कॉंक्रीटीकरण करणे (१० लाख रुपये), सम्राट अशोकनगर वडगाव हवेली येथील रस्ता कॉंक्रीटीकरण करणे (९ लाख रुपये), आण्णाभाऊ साठे नगर वाठार येथे नळपाणी पुरवठा कनेक्शन व मीटर बसवणे (८ लाख रुपये), आण्णाभाऊ साठे नगर विठ्ठलवाडी येथे रस्ता कॉंक्रीटीकरण व गटार बांधकाम करणे (१० लाख रुपये), आवळे वस्ती अकाईचीवाडी येथे रस्ता कॉंक्रीटीकरण करणे (६ लाख रुपये), सिद्धार्थनगर मनव येथे रस्ता कॉंक्रीटीकरण करणे (९ लाख ५० हजार रुपये), सम्राटनगर सवादे येथे रस्ता कॉंक्रीटीकरण व बंदिस्त गटार करणे (९ लाख रुपये), सिद्धार्थनगर जिंती येथील रस्ता कॉंक्रीटीकरण व बंदिस्त गटार करणे (१० लाख रुपये), आदर्शनगर शेरे येथे बंदिस्त गटार करणे (९ लाख रुपये), रोहिदासनगर चर्मकार वस्ती कासारशिरंबे येथील खंडोबा मंदिर ते चर्मकार वस्तीपर्यंत रस्ता कॉंक्रीटीकरण करणे (१० लाख रुपये), रमाईनगर ओंड येथे आरसीसी गटार व रस्ता कॉंक्रीटीकरण करणे (१० लाख रुपये), भीमनगर व संत रोहिदास नगर तारुख येथे आरसीसी गटार करणे (९ लाख रुपये), जय मल्हार कॉलनी घोणशी येथे रस्ता कॉंक्रीटीकरण व आरसीसी गटार करणे (९ लाख रुपये), होली फॅमिली सैदापूर पाठीमागील रस्ता कॉंक्रीटीकरण करणे (९ लाख रुपये), झिमरे - साळुंखे वस्ती गोळेश्वर येथील रस्ता कॉंक्रीटीकरण करणे (९ लाख रुपये).
------------------------------------

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त