सातारारत्न पुरस्काराने डॉ.सुनील तांबवेकर सन्मानित

डॉक्टर.सुनील एकनाथ तांबवेकर यांना सातारा रत्न पुरस्काराने सन्मानित करताना डॉ.राजेंद्र भोसले, महंत सुंदरगिरी महाराज, प्रा.यशवंत पाटणे, नाना निकम,  बाबुराव माने व इतर मान्यवर.
सातारारत्न पुरस्काराने डॉ.सुनील तांबवेकर सन्मानित
कराड, दि.२६: मुंबई येथील आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने वाडिया मॅटर्निटी हॉस्पिटल, सेठ जी.एस वैद्यकीय महाविद्यालय, के.ई.एम.रुग्णालय, परळ, मुंबई येथील सिनियर असिस्टंट प्रोफेसर, स्त्रीरोग तज्ञ, शल्यचिकित्सक, प्रसूती शास्त्र तज्ञ व एंडोस्कोपिक सर्जन डॉ.सुनील एकनाथ तांबवेकर यांना सातारा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ.सुनील तांबवेकर हे मुळचे घोगाव, ता.कराड येथील रहिवासी आहेत. सातारा रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

दादर येथील शिवाजी मंदिर येथे आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुंबई आणि परिसरातील सातारकरांसाठी असलेल्या संकल्पित सातारा भवनचे शानदार उद् घाटन करण्यात आले. यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, सेवागिरी संस्थान पुसेगाव महंत सुंदरगिरी महाराज, प्रा.यशवंत पाटणे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष नाना निकम, माजी आमदार आणि प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष बाबुराव माने, कराड अर्बन बँकेचे चेअरमन डॉ.सुभाष एरम, सुभाष जोशी, ज्ञानदीप पतसंस्थेचे जिजाबा पवार शिवकृपा पतसंस्थेचे संचालक चंद्रकांत वंजारी, सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुंबै बँकेचे संचालक आनंदराव गोळे, शिवसहयाद्री पतसंस्थेचे अध्यक्ष पिंपळे, पुष्पक पतसंस्थेचे अध्यक्ष पवार, समाजसेवक एकनाथ तांबवेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष नाना निकम संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. माजी आमदार आणि प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष बाबुराव माने यांनी प्रास्ताविक केले. माधुरी काळभोर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परिसरातील सातारकर नागरिक उपस्थित होते.
कराड तालुक्यातील घोगाव येथील रहिवाशी डॉ.सुनिल एकनाथ तांबवेकर यांना वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल सातारा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ते स्त्रीरोग तज्ञ, शल्यचिकित्सक, प्रसूती शास्त्र तज्ञ व एंडोस्कोपिक सर्जन असून वाडिया मॅटर्निटी हॉस्पिटल, सेठ जी.एस वैद्यकीय महाविद्यालय, के.ई.एम.रुग्णालय, परळ, मुंबई येथील सिनियर असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत व इतर रुग्णालयांत व्हिसिस्टींग कन्सलटन्ट म्हणून ते वैद्यकीय सेवा बजावत आहेत. 'जर्नल ऑफ ऑब्स्टॅट्रिक्स अँड गायनेकॉलॉजी ऑफ इंडिया' मध्ये जॉईन्ट असिस्टंट सेक्रेटरी या पदावर नुकतीच नियुक्ती झाली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील या प्रदीर्घ अनुभवाची दखल घेऊन देण्यात आलेल्या पुरस्काराबद्दल डॉ. तांबवेकर यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.