पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे ऑनलाइन उद्घाटन संपन्न*

*पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे ऑनलाइन उद्घाटन संपन्न*

*कराड वार्ता न्युज नेटवर्क सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला
सातारा जिल्ह्यातील २० केंद्रांचे उद्घाटन; पाटण तालुक्यात मल्हारपेठ व तारळे येथे कौशल्य विकास केंद्र*

गुरुवार, १९ ऑक्टोबर २०२३

राज्यातील ५११ ग्रामीण भागातील प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी  मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन संपन्न झाले. यात सातारा जिल्ह्यातील २० केंद्रांचाही समावेश आहे. कोडोली ग्रामपंचायतीच्या सांस्कृतिक भवनामध्ये झालेल्या या कार्यक्रमास मुंबई येथून मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब, मा. अजितदादा पवार साहेब व मंत्रिमंडळातील अन्य सदस्यांसह पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेब दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित राहिले.

यावेळी सातारा जिल्ह्यातील  सातारा तालुक्यातील कोडोली, लिंब व नागठाणे, कराड तालुक्यातील विंग, सैदापूर, उंब्रज, रेठरे बु., खंडाळा तालुक्यात शिरवळ व पारगाव, खटाव तालुक्यात औंध व पुसेगाव, कोरेगाव तालुक्यात वाठार स्टेशन, माण तालुक्यात गोंदवले बु., *पाटण तालुक्यात मल्हार पेठ व तारळे*, जावळी तालुक्यात कुडाळ, फलटण तालुक्यात कोळकी, महाबळेश्वर तालुक्यात भिलार आणि वाई तालुक्यात यशवंतनगर व भुईंज या ठिकाणी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले.   

आज आपला देश कौशल्य व तंत्रज्ञानाच्या जोरावर प्रगती करत आहे. यात अधिकाधिक विद्यार्थ्यांनी व्यावसायिक कौशल्ये मिळवण्याच्या दृष्टीने ही कौशल्य विकास केंद्रे उपयुक्त ठरतील, असा विश्वास मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी व्यक्त केला आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कौशल्य विकास केंद्रांच्या माध्यमातून व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करावीत, असे आवाहन मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यानिमित्ताने केले आहे. 

या कार्यक्रमास आमदार मा. महेश शिंदे यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य संजय मांगलेकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रवी साळुंखे, अर्चना देशमुख, विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, तसेच संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.