कराड : भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदी कराड भाजपा शहराध्यक्ष श्री एकनाथ बागडी यांची निवड

कराड : भारतीय जनता पार्टी  कामगार मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदी कराड भाजपा शहराध्यक्ष श्री एकनाथ बागडी  यांची निवड झाली असून. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा  प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात,मा.विक्रांतजी पाटील मा.मुरलीअण्णा मोहोळ यांच्या मार्गदर्शनात भाजपा कामगार   मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष यांनी श्री विजयजी हरगुडे कामगार मोर्चा ची राज्य कार्यकारिणी मुंबई  येथे भाजपा प्रदेश कार्यालयात जाहीर केली आहे.एकनाथ बागडी यांची कामगार मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे, आमदार जयकुमार गोरे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य अतुलबाबा भोसले,भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर,भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम,भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य भरतनाना पाटील, मा.रामभाऊ वेताळ, जिल्हापरिषद सदस्य सागर शिवदास,यांनी अभिनंदन व सत्कार केला.
एकनाथ बागडी यांनी भारतीय जनता पार्टी कराड शहरामध्ये 15 वर्षे अत्यंत निष्ठेने व मोठ्या जोमाने काम सुरू ठेवले आहे. भारतीय जनता पार्टीचे विचार व पक्षाने केलेले काम अत्यंत निष्ठेने ते लोकांच्या पर्यंत पोहोचवत आहेत यामुळेच हे पद त्यांना देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी कराड दक्षिण विधानसभा सर्व पदाधिकारी,बूथ अध्यक्ष,शकिकेंद्र प्रमुख शहरातील, सर्व मान्यवर यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या
कराड वार्ता .सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.