आज कराड उत्तरचे युवा नेते मा. रामकृष्ण वेताळ साहेब,यांनी कराड आगार प्रमुख व्यवस्थापक कुलदीप डुबल व वाहतूक नियंत्रक श्री कचरे यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या समस्या

*विद्यार्थी समस्यांचा पाठपुरावा करून सहकार्याचा शब्द पाळला*.
    कराड वार्ता न्यूज सह्याद्रि वार्ता न्यूज नेटवर्क कराड असलम मुल्ला
*आज कराड तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांच्या प्रवासाच्या समस्या लक्षात घेऊन आणि त्यांच्या शिक्षणामध्ये येत असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांच्या मागणीनुसार आज कराड उत्तरचे युवा नेते मा. रामकृष्ण वेताळ साहेब,यांनी  कराड आगार प्रमुख व्यवस्थापक कुलदीप डुबल व वाहतूक नियंत्रक श्री कचरे यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या आणि कराड - मसूर - उंब्रज, कराड मसूर -  उंब्रज - चाफळ, कराड - उंब्रज -  तारळे, कराड - पाचुंद - शाळगाव - पुसेसावळी ,उंब्रज - मसूर -  पुसेसावळी, कराड- कालगाव- तारगाव, या शटल सेवा सुरू करण्याविषयी निवेदन दिले .अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली. अधिकाऱ्यांनीही या मागणीवर योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे विद्यार्थी बांधवांची प्रवासाची सोय होऊन त्यांचे शिक्षण सुलभ होणार आहे*. 
      *यावेळी भाजपा जिल्हा सचिव दिपालीताई खोत, सरचिटणीस शंकरराव शेजवळ, विस्तारक सुनील शिंदे, सरचिटणीस शहाजी मोहिते,उदय जगदाळे,नविन जगदाळे, मानसिंग कदम ,सुभाष जाधव, शिवाजी भोसले,अक्षय चव्हाण,रनजीत यादव, राजेंद्र लोहार,उत्तम जाधव, शशिकांत जाधव, मानसिंग जाधव,मारुती जाधव, अतुल जगदाळे,गणेश जाधव,प्रजत कदम, सुमित शहा, सोमनाथ साळुंखे,मोहिनी धस व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते*

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.