कराड नाकर्तेपणा लपवण्यासाठी इतरांनी साकारलेल्या कामांची भूमिपूजने करू नयेत.रामकृष्ण वेताळ.

कराड नाकर्तेपणा लपवण्यासाठी इतरांनी साकारलेल्या कामांची भूमिपूजने करू नयेत.रामकृष्ण वेताळ.
ओगलेवाडीः अनेक वर्ष आमदार आणि मंत्री, पालकमंत्री असूनही कराड उत्तरेसाठी निधी आणता आला नाही. म्हणून इतरांनी निधी आणलेल्या कामांची उद्घाटने आणि भूमिपूजन करून श्रेय लाटण्याचा प्रकार कराड उत्तर मतदारसंघात सुरू आहे. लोकांना सर्व समजत असल्याने हा प्रकार थांबवावा असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांनी केले आहे.
       प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, मरळी भगतवाडी रस्ता, शिवडे भवानवाडी रस्ता,गजानन हाऊसिंग सोसायटी गणपती मंदिर ते विरवडे करवडी रस्ता आणि सुरली पाटी ते कामथी पाचुंद रस्ता, या रस्त्यासाठी तत्कालीन जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनानुसार  नुतन जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, नेते मनोज घोरपडे आणि प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ व  भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले आहेत. 
   या रस्त्यासाठी सुमारे 15 कोटी रुपये निधी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे. परंतु स्वतः काही करता आले नसल्याने हा निधी आम्हीच आणला असे भासवून या कामांची मोठ्या थाटामाटा भूमिपूजने घेतली जात आहेत. ही भूमिपूजने घेण्यामागील उद्देश आपला नाकर्तेपणा लपवून फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि लोकांच्या नजरेत भरून राहण्यासाठी चाललेला हा उपद्वाप आहे.परंतु कराड उत्तरची जनता आता सुज्ञ झाली असल्याने,कामाचे कोण? आणि बिनकामाचे कोण? यातील फरक त्यांनी ओळखला आहे .अशा लोकांना येणाऱ्या निवडणुकीत जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. लवकरच या कामांचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीच्या वतीने होऊन लोकांना कामे कोणी आणले आहेत याचा उलगडा होणार आहे.असेही निवेदनात म्हटले आहे. 

 चौकट
 आम्ही आणलेल्या कामाची उद्घाटने इतरांनी करू नयेत.
कराड उत्तर मधील अनेक गावांना स्वातंत्र्यापासून मागील 75 वर्षात रस्ते झाले नव्हते. रस्त्यांची मागणी करून काहीही हाती लागत नव्हते अशा गावांना रस्ता मिळवण्यासाठी आम्ही भाजपाच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी या गावांसाठी सुमारे 15 कोटी निधी दिला.त्यामुळे या रस्त्यांचे भूमिपूजन करण्याचा अधिकार फक्त भाजपाला आहे. इतरांनी श्रेयासाठी यांची भूमिपूजने करू नयेत. लवकरच भारतीय जनता पार्टीच्या वतीने हा सोहळा संपन्न होणार आहे.
रामकृष्ण वेताळ प्रदेश सरचिटणीस भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.