कराड | कराड शहरातील मुजावर कॉलनीत बुधवारी सकाळी भीषण स्फोट झाला

कराड | कराड शहरातील मुजावर कॉलनीत बुधवारी सकाळी भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे घराची भिंत सुमारे 25 फूट वरती उडून समोरील घराच्या पत्र्यावरती पडली. स्फोटात शरीफ मुल्ला यांच्यासह शेजारील कुटूंबातील लोक जखमी झाले आहेत. स्फोट एवढा जबरदस्त होता की 6 घराच्या भिंतींचीही पडझड झाली असून 6 दुचाकी गाडीचेही नुकसान झाले आहे. स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

मुजावर कॉलनीतील शांतीनगर येथे शरीफ मुल्ला कुटूंबासह राहतात. बुधवारी सकाळी त्यांच्या घरात अचानक स्फोट झाला. अचानक झालेल्या स्फोटामुळे मुल्ला कुटूंबियांना बचावासाठी धावण्याची संधीच मिळाली नाही. स्फोटात मुल्ला कुटूंबातील पाचजण जखमी झाले. स्फोटाचा आवाज एवढा भीषण होता की संपूर्ण मुजावर कॉलनी परिसर हादरून गेला.

अग्निशमन दलासह स्थानिक नागरिकांनी धावपळ करत आग आटोक्यात आणली. जखमींना कृष्णा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याचे सांगितले जात असले तरी हा भीषण स्फोट व झालेले नुकसान पाहता तर्कवितर्कांना उधाण आले असून नेमका स्फोट कसा झाला याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे.

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.