भाजपा किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस पदी रामकृष्ण वेताळ

भाजपा किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस पदी रामकृष्ण वेताळ

कराड वार्ता सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला
भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस पदी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते रामकृष्ण वेताळ यांची निवड झाली असून
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,भाजपा  प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात, विक्रांत पाटील  यांच्या मार्गदर्शनात भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या भेगडे यांनी किसान मोर्चा ची राज्य कार्यकारिणी मुंबई  येथे  भाजपा प्रदेश कार्यालयात जाहीर केली आहे.
भारतीय जनता पार्टी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये रामकृष्ण वेताळ यांनी गेली २० वर्षे अत्यंत निष्ठेने व मोठ्या जोमाने काम सुरू ठेवले आहे .भाजपा किसान मोर्चाचे ते प्रदेश सचिव म्हणून याचबरोबर सध्या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ प्रचार प्रमुख म्हणून देखील ते काम करीत आहेत कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील सर्वच गावांमध्ये भारतीय जनता पार्टीचे विचार व पक्षाने केलेले काम अत्यंत निष्ठेने ते लोकांच्या पर्यंत पोहोचवत आहेत रामकृष्ण वेताळ यांची किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य अतुल बाबा भोसले, भाजपा प्रदेश  उपाध्यक्ष विक्रम पावसकर ,भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य भरत नाना पाटील,
 भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम ,,कराड उत्तर चे युवा नेते मनोज दादा घोरपडे ,माजी आमदार मदन भोसले, जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास ,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष  सुरेश तात्या पाटील, भाजपा सातारा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद आप्पा गायकवाड, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने, कराड तालुका अध्यक्ष महेश कुमार जाधव, पंचायत समिती सदस्य सुरेश कुंभार, ओबीसी जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे बापू, सरचिटणीस शंकरराव शेजवळ,    सूर्यकांत पडवळ,  सरचिटणीस शहाजी मोहिते, सौ.  दिपाली ताई खोत यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.