Posts

Showing posts from June, 2025

माउली’च्या जयघोषाने लोणंदनगरी दुमदुमली

Image
माउली’च्या जयघोषाने लोणंदनगरी दुमदुमली  प्रशासनाचा माऊली पालखी तळावर गोधळ  नियोजनाचा अभाव  पुणे जिल्ह्यातील आपला प्रवास संपवून सातारा जिल्ह्यात वैष्णवांचा मेळा दाखल.     फुलाची चादर टाकून रंग रांगोळी काढून केले माऊलीचे स्वागत दर्शन रांगेच्या बद्दला मुळे भक्ता मध्ये प्रंचड गोंदळ तुफान गर्दी  पोलीस प्रशासनाचे दुलक्ष  लोणंद प्रतिनिधी- अक्षय दोशी हरिनामाच्या जयघोषात आणि टाळ-मृदुंगांच्या गजरात गुरुवारी   दुपारी दिड वाजता श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने निरा नदीकाठी पुणे जिल्ह्यातील आपला प्रवास संपवून निरा नदीवरील जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून मार्गक्रमण करत टाळ मृदुंगाच्या साथीत मोठ्या आनंदाने भक्तिमय वातावरणात सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. पालखी सोहळयाचे प्रवर्तक हैबतबाबांची भूमी असलेल्या सातारा जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर निरा नदीवरील माऊली भक्तांनी टाळ मृदुंगाच्या गजरात आणि माऊली माऊली च्या जयघोषात जलतुषार आणि फुलांच्या वर्षावात प्रसिद्ध दत्तघाट या ठिकाणी माऊलींच्या पादूकांना निरा स्नान घालण्यात आले. यावेळी सा...

लायन्स क्लब कराड मेनच्या अध्यक्षपदी ला.अजय ओझा यांची निवड

Image
लायन्स क्लब कराड मेनच्या अध्यक्षपदी ला.अजय ओझा यांची निवड  सचिव ला.श्रीपाल ओसवाल तर खजिनदार ला.गिरीश शहा ; 2 जुलै रोजी होणार पदग्रहण समारंभ  कराड दि. लायन्स क्लब ऑफ कराड मेन या क्लबच्या सन 2025 - 26 या वर्षासाठी अध्यक्षपदी ला.अजय ओझा यांची एकमताने निवड करण्यात आली तसेच सचिवपदी ला.श्रीपाल ओसवाल तर खजिनदारपदी ला.गिरीश एम. शहा यांची निवड करण्यात आली आहे.  लायन्स क्लब ऑफ कराड मेन क्लबच्या संचालक मंडळ व सर्वसाधारण सभेत ला.संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी करण्यात आल्या.  समाजातील गरजूंना मदत करण्यासाठी लायन्स इंटरनॅशनल ही संघटना जागतिक पातळीवर काम करत आहे. या संघटनेचा विस्तार 214 देशात असून याची सदस्य संख्या 14 लाखापेक्षा अधिक आहे. लायन्स इंटरनॅशनल संघटनेच्या माध्यमातून गरजूंना अनेक वैद्यकीय सेवा पुरवण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. संघटनेच्या या कार्यामुळे गरजूंना मोठा आधार मिळतो आहे. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने कार्य करत असलेल्या संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वावर लायन्स क्लब ऑफ कराड मेन या क्लबची वाटचाल सुरू आहे. कराड मेन क्लबच्या माध्यमातून कराड पाटण...

कराड दक्षिणमधील ११ गावे सौर हायमास्ट दिव्यांनी उजळणार

Image
कराड दक्षिणमधील ११ गावे सौर हायमास्ट दिव्यांनी उजळणार आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांमुळे ४.७० कोटींचा निधी मंजूर  कराड, ता. १६ : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना’ ठिकाठिकाणी राबविली जात आहे. याअंतर्गत कराड दक्षिणमधील ११ गावांमधील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील वसाहतींमध्ये तब्बल २२ सौर हायमास्ट दिव्यांची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नातून ४ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.  राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील समाजाच्या विकासासाठी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार विशेष प्रयत्नशील आहे.  अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील वसाहतींमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना राबविली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून कराड दक्षिणमधील ११ गावांमध...

कराड शहर व कराड तालुक्यातील विविध विकास कामासंदर्भात

Image
कराड शहर व कराड तालुक्यातील विविध विकास कामासंदर्भात  तसेच नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी दरे येथे जाऊन सविस्तर चर्चा केली व त्यांना निवेदन देताना माननीय कराड शहर प्रमुख राजेंद्र माने सातारा उपजिल्हाप्रमुख शंकरराव वीर कराड उत्तर तालुकाप्रमुख तुषार निकम डॉक्टर धैर्यशील माने शिवसैनिक दिग्विजय पवार इत्यादी उपस्थितीत होते

वारकऱ्यांच्या सोयी सुविधांसाठी शासकीय यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवून काटेकोरपणे जबाबदारी पार पाडावी**-पालकमंत्री शंभूराज देसाई*

Image
*वारकऱ्यांच्या सोयी सुविधांसाठी शासकीय यंत्रणांनी आपापसात   समन्वय ठेवून काटेकोरपणे जबाबदारी पार पाडावी* *-पालकमंत्री शंभूराज देसाई*      सातारा दि. १५ : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे २६ जून रोजी सातारा जिल्ह्यात आगमन होणार असून ३० जून रोजी पालखी सोहळ्याचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश होणार आहे.  माऊलीच्या पालखीचा मुक्काम लोणंद, तरडगाव, फलटण व बरड या ठिकाणी होणार आहे. या सोहळ्याच्या अनुषंगाने वारकऱ्यांना चांगल्या सोयी सुविधा मिळण्यासाठी शासकीय यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवून जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, पालखी मार्गावरील सुरू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.  लोणंद येथील नगरपंचायत सभागृहात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पूर्व तयारीच्या अनुषंगाने पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, अतिरिक्त मुख्य कार...

सरकार नोंद असलेल्या गावठाणांचा प्रश्न सोडवण्यास शासन कटिबद्ध**-पालकमंत्री शंभूराज देसाई*

*सरकार नोंद असलेल्या गावठाणांचा प्रश्न सोडवण्यास शासन कटिबद्ध* *-पालकमंत्री शंभूराज देसाई*    सातारा दि. 14 :  कराड तालुक्यातील साजूर, साकुर्डी, सुपने, केसे गावातील सरकार नोंद असलेल्या गावठाणाचा प्रश्न सोडवण्यास शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. पाटण येथील शासकीय विश्रामगृहात कराड तालुक्यातील साजूर, साकुर्डी, सुपने, केसे गावातील सरकार नोंद असलेल्या गावठाण संदर्भातील बैठक पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.  बैठकीस  जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण,  कराड उपविभागाचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, पाटण उपविभागाचे प्रांताधिकारी सोपान टोम्पे,  कराड तहसीलदार कल्पना ढवळे, पाटणचे तहसीलदार अनंत गुरव, कराडचे गट विकास अधिकारी प्रताप पाटील आदी उपस्थित होते.  कराड तालुक्यातील साजूर, साकुर्डी सुपने, केसे गावातील संबंधित लोकांच्या गावठाणांचा प्र...

साजूर, तांबवे, किरपे, शेनोली रस्त्याचे काम तात्काळ थांबवावे**-पालकमंत्री शंभूराज देसाई*

*साजूर, तांबवे, किरपे, शेनोली रस्त्याचे काम तात्काळ थांबवावे* *-पालकमंत्री शंभूराज देसाई*    सातारा दि. 14 :  कराड तालुक्यातील  साजूर, तांबवे, किरपे  शेनोली गावातील रस्त्याच्या  कामामुळे गावातील नागरिकांना व शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने रस्त्याचे काम तात्काळ थांबवण्याचे निर्देश राज्याचे पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.  पाटण येथील शासकीय विश्रामगृहात कराड तालुक्यातील राजुरेश्वर, एकेश्वरी तांबवे पाणीपुरवठा योजना संदर्भात साजुर, तांबवे, किरपे, शेणोली रस्ता क्रॉसिंगबाबत बैठक पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.  बैठकीस  जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कराड उपविभागाचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, कराडचे तहसीलदार कल्पना ढवळे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पायाभूत सुविधा महामंडळा...

पालकमंत्र्यांनी केली पाटण शहरातील सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी

*पालकमंत्र्यांनी केली पाटण शहरातील सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी* सातारा दिनांक 14: पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण शहरातील सुरू असलेल्या विविध  विकास कामांची पाहणी केली.  यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, पाटणचे उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव यांच्यासह  आदी यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.    यावेळी पालकमंत्री श्री.  देसाई यांनी पाटण शहरातील रस्ते, पूल प्रशासकीय इमारत, पिण्याच्या टाकीचे बांधकामास, उपजिल्हा रुग्णालय, पाटण एसटी डेपो यांना भेट देऊन सुरू असलेल्या व पूर्णत्वास येत असलेल्या असलेल्या कामांची पाहणी केली.  पाहणी दरम्यान कामाच्या दर्जाबाबत व पूर्णत्वाबाबत अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. ००

सातारा पुणे मार्गावरील पाचवड फाट्या पासून 5 किलोमीटर अंतरावरील वडाचे मसवे म्हणून कुडाळ विभागातील मोठे गाव

Image
सातारा पुणे मार्गावरील पाचवड फाट्या पासून 5 किलोमीटर अंतरावरील वडाचे मसवे म्हणून कुडाळ विभागातील मोठे गाव या गावाला सामाजिक राजकीय व सहकार शैक्षणिक असा मोठा वारसा लाभला आहे.      कलकत्ता येथील बॉटनीक गार्डन सारख्या ठिकाणी 5 एकर क्षेत्रात वडाच्या  झाडाची नोंद आहे. या गावच्या प्रवेशद्वारावर भव्य व जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणा जवळ असे वडाच भव्य दिव्य झाड आहे.   वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी लक्ष घालून येथील या पुरातन झाडाच्या परिसरात विकासात्मक कामे करावीत अशी मागणी होत असून पर्यटन दर्जा लाभलेल्या वडाच्या मसवे गावात शासकीय पातळीवर दखल घेवून या ठिकाणी जास्तीत जास्त विकासासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे येथील महिलांनी केली असून सुस्त असलेल्या वनविभागाने आज वटपौर्णिमेच्या दिवशी विकासासाठी प्रयत्न करण्याची मागणी महिला वर्गातून होत आहे....  . मोहन जगताप

अंकिता पाटील यांचे यश विद्यार्थ्यांना प्रेरणादायी पृथ्वीराज चव्हाण यांचे प्रतिपादन; यूपीएससी परीक्षेतील यशाबद्दल कराडकर यांच्या वतीने सत्कार

Image
अंकिता पाटील यांचे यश विद्यार्थ्यांना प्रेरणादायी  पृथ्वीराज चव्हाण यांचे प्रतिपादन; यूपीएससी परीक्षेतील यशाबद्दल कराडकर यांच्या वतीने सत्कार  कराड वार्ता न्युज नेटवर्क केंद्रीय लोकसेवा आयोग तथा यूपीएससीची परीक्षा ही देशातील अत्यंत अवघड परीक्षा आहे. देशातील गुणवंत विद्यार्थी भारतीय प्रशासकीय सेवेत निवडले जावेत, हा यूपीएससीच्या परीक्षा मागे उद्देश आहे‌. या परीक्षेत अंकिता पाटील यांनी मिळवलेले यश हे विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. यूपीएससी परीक्षेत 303 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल अंकिता पाटील यांचा कराडकरांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, पुणे सिंहगड इन्स्टिट्यूटचे संचालक प्रकाश पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी चैतन्य कणसे, माजी परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष जयवंतराव पाटील, माजी नगराध्यक्ष अर्चना पाटील, अशोकराव पाटील, शिवराज मोरे, अरुण पाटील, मनोहर शिंदे, प्रा. सतीश घाटगे, हिंदु...

*झालेल्या पावसाने बांबू लागवडीसाठी जमीन उत्तम**बांबू लागवड करावी**-जिल्हाधिकारी संतोष पाटील*कराड वार्ता न्युज

Image
*झालेल्या पावसाने बांबू लागवडीसाठी जमीन उत्तम* *बांबू लागवड करावी* *-जिल्हाधिकारी संतोष पाटील*कराड वार्ता न्युज सातारा दि.9 – जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असून ओढ्या नाल्याना पाणी वाहत आहे. बांबू लागवडीसाठी जमीनही उत्तम झाली असून कृषि, सामाजिक वनीकरण विभागाने तातडीने बांबू वृक्षाची लागवड करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.   जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बांबू लागवड अभियान विषयक आढावा बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.  बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उप वन संरक्षक आदीती भारद्वाज, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे, यांच्यासह आदी  उपस्थित होते.   जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत कराड, पाटण खंडाळा, कोरेगाव, जावली या तालुक्यांमध्ये 46.30 हेक्टरवर 31 हजार  738 बांबू वृक्षाची लागवड करावयाची आहे. ही लागवड लवकरात लवकर पुर्ण करावी. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमार्फत बांबू लागवड करावयाची आहे.  या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे. तसेच महात्मा गांधी राष...

कराड, ता. ८ : गेल्या अनेक वर्षांपासून पुणे-बंगळुरु आशियाई महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम

Image
महामार्ग रस्ते काम - दिल्ली भेट बातमी कराड, ता. ८ : गेल्या अनेक वर्षांपासून पुणे-बंगळुरु आशियाई महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. या कामाअंतर्गत कराड शहरालगत सहापदरी उड्डाणपूलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र या कामाच्या दिरंगामुळे कराड परिसरातील महामार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत असून, परिणामी अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. काही घटनांमध्ये दुर्दैवाने जीवितहानीदेखील झाली आहे. याची गंभीर दखल घेत, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी थेट नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाला भेट देत, अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आग्रही मागणी केली.  पुणे - बंगळुरू महामार्ग हा राष्ट्रीयदृष्ट्या अतिशय महत्वाचा दळणवळण मार्ग असून, यावरील वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवणे ही केवळ स्थानिक नव्हे तर राष्ट्रीय सुरक्षिततेशी संबंधित बाब आहे. पण हे काम संथगतीने सुरू असून, या मार्गावर सातत्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन, गंभीर अपघाताचे प्रकार घडत आहेत. याबाबत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी जनतेतून होत आहे.  याची गंभीर दखल घेत आमदार ड...

सामाजिक बांधिलकी जपत तांबवेच्या शिबिरात 50 युवकांनी केले रक्तदान

Image
सामाजिक बांधिलकी जपत तांबवेच्या शिबिरात 50 युवकांनी केले रक्तदान कराड वार्ता न्यूज नेटवर्क  तांबवे :  शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर तांबवे (ता. कराड) येथे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील युवा संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात  येथील पन्नास युवकांनी रक्तदान केले.  तांबवे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शुक्रवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  तांबवे  गेली सलग आठ वर्षांपासून प्रदीप पाटील मित्र मंडळ व कराड येथील यशवंतराव चव्हाण रक्त पेढी यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबीर घतले जाते.छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम एक सामाजिक बांधिलकी म्हणून घेतला जातो. रक्तदान करणारे युवकांना एक छत्री व प्रशस्तिपत्र देण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन सरपंच जयश्री कबाडे,उपसरपंच अँड विजयसिंह पाटील, रयत सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदीप पाटील, वैभव शिंदे, नितीन पवार, नितीन फल्ले, श्रीकांत पवार, विक्रम पाटील, संभाजी पवार, संभाजी शिं...

बोगस मतदान व वाढलेली टक्केवारी याबाबत निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद - पृथ्वीराज चव्हाण*

Image
*बोगस मतदान व वाढलेली टक्केवारी याबाबत निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद - पृथ्वीराज चव्हाण*    *जय-पराजय होत असतो पण निवडणूक प्रक्रियेमध्ये पक्षपाती पणा करून निकाल वळविण्याची चुकीची पद्धत महाराष्ट्र निवडणुकीत पहिल्यांदाच इतिहासात नोंद झाली.*  कराड : महाराष्ट्राच्या विधानसभेचा जो निकाल लागला तो अनपेक्षित निकाल होता. २०२४ च्या लोकसभा ते विधानसभा निवडणुकी दरम्यानच्या ४-५ महिन्याच्या कालावधीत नवीन मतदार संख्येत लक्षणीय वाढ झालेली आढळून येते. या प्रक्रियेत दुबार, तिबार मतदारांची मतदार यादीत नावे असताना निवडणूक आयोगाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. बोगस मतदार वाढीची प्रक्रिया राज्यभर आयोगाने राबविली. तसेच मतदानाच्या आकडेवारीत सुद्धा वाढलेली टक्केवारी बाबत कोणतेही उत्तर निवडणूक आयोगाकडून दिले गेले नाही. त्यामुळे महाराष्ट्र निवडणुकीत बोगस मतदान व वाढलेली टक्केवारी बाबत निवडणूक आयोगाची प्रक्रिया संशयास्पद असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.  याआधी अनेक निवडणूका आम्ही लढवल्या आहेत. यंत्रणेचा अशाप्रकारे गैरवा...

क्रीडामंत्री मुंबई बैठक बातमी कराड वार्ता न्यूज मुंबई, ता. ५ : ऑलिम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव यांच्या स्मरणार्थ गोळेश्वर (ता. कराड) येथे

Image
क्रीडामंत्री मुंबई बैठक बातमी कराड वार्ता न्यूज मुंबई, ता. ५ : ऑलिम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव यांच्या स्मरणार्थ गोळेश्वर (ता. कराड) येथे शासनाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती क्रीडा संकुल आराखड्याचे सादरीकरण राज्याचे क्रीडामंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्यासमोर करण्यात आले. याप्रसंगी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले प्रमुख उपस्थित होते. यावेळी क्रीडामंत्र्यांनी या आराखड्याचे कौतुक करुन, क्रीडा संकुलाच्या कामाला तातडीने गती देण्याचे आदेश प्रशासनाला दिले.    कराड तालुक्यातील गोळेश्वर येथील पैलवान खाशाबा जाधव यांनी भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले. त्यांच्या या कार्याचे स्मरण व्हावे आणि त्यापासून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, यासाठी पैलवान खाशाबा जाधव यांच्या गोळेश्वर गावी त्यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती क्रीडा संकुल उभारण्याचा शासनाने निर्धार केला आहे. या संकुलाच्या कामाला लवकरात लवकर प्रारंभ व्हावा, यासाठी कराड दक्षिण विधानसभेचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले प्रयत्नशील आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी याप्रश्नी शासकीय अधिकाऱ्यांची ...

तालुकास्तरावर मोफत पाठ्यपुस्तके वितरण शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी मिळणार मोफत पाठ्यपुस्तके

Image
तालुकास्तरावर मोफत पाठ्यपुस्तके वितरण  शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी मिळणार मोफत पाठ्यपुस्तके                      ‌‌तांबवे - सर्व शिक्षा अभियानांतर्गत दिल्या जाणारी मोफत पाठ्यपुस्तक तालुकास्तरावरती उपलब्ध झालेले आहेत. सर्व स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद व नगरपालिका प्राथमिक शाळा,सर्व अनुदानित खाजगी माध्यमिक व प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व  विद्यार्थ्याना केंद्र सरकार व राज्य शासनाच्या वतीने मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. चालू 2025/2026 शैक्षणिक वर्षातील मोफत पाठ्यपुस्तकाचे ४३२५१ संच उपलब्ध झाले आहेत.जिल्हा स्तरावरुन तालुकास्तरावर प्राप्त झाले त्याचे केंद्र स्तरावर वितरण करण्यात आले असले ची माहिती गटशिक्षणाधिकारी बिपिन मोरे यांनी दिली. जिल्हापरिषद , नगरपालिका व सर्व अनुदानित, अंशतः अनुदानित माध्यमिक व खाजगी प्राथमिक शाळेतील सर्व मुला मुलींना ही मोफत पाठ्यपुस्तकाचे शाळेच्या पहिल्या दिवशी वितरण केलं जातं. चालु शैक्षणिक वर्षासाठी एकुण ४३२५१ पुस्तकाचे संच उपलब्ध झाले आहेत. यामध्ये इयत्ता ...

बकरी ईद निमित्त तात्पुरत्या कत्तलखाण्यासाठी* *नगर पालिका व ग्रामपंचायतींकडे अर्ज करावे**- जिल्हाधिकारी संतोष पाटील*

*बकरी ईद निमित्त तात्पुरत्या कत्तलखाण्यासाठी*  *नगर पालिका व ग्रामपंचायतींकडे अर्ज करावे* *- जिल्हाधिकारी संतोष पाटील* सातारा  दि. 2: बकरी ईद येत्या 7 जून रोजी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या बकरी ईद निमित्त होणाऱ्या जनावरांच्या कुर्बानीसाठी तात्पुरत्या कत्तल खान्यासाठी कुरेशी समाजाने शहरी भागात नगर पालिकाकडे व ग्रामीण भागात ग्रामपंचायतीकडे परवानगीचे अर्ज करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिल्या. बकरी ईद निमित्त प्राणी क्लेश प्रतिबंध सोसायटीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीला जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे, सहायक आयुक्त डॉ. नितीन मगर,डॉ. सोमनाथ गावडे यांच्यासह पशुसंर्धन विभागातील अधिकारी उपस्थित होते. तात्पुरत्या कत्तल खाण्याला सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्या, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी             श्री. पाटील म्हणाले, तात्पुरत्या कत्तलखाण्यासंदर्भात सर्व नगर पालिका, नगर पंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांसोबत बैठक घ्यावी. त्यांना महराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 ची कत्तल खाण्या...

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची उपस्थिती: १०६२ विद्यार्थ्यांना होणार पदवी प्रदान

Image
कृष्णा विश्व विद्यापीठाचा मंगळवारी १३ वा दीक्षांत सोहळा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची उपस्थिती: १०६२ विद्यार्थ्यांना होणार पदवी प्रदान कराड, ता. २ : येथील कृष्णा विश्व विद्यापीठाचा १३ वा दीक्षांत सोहळा मंगळवार दिनांक ३ जून रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन उपस्थित राहणार असून, कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. या सोहळ्याला आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, कुलपतींचे प्रधान सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डॉ. प्रवीण शिनगारे, कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा आदी मान्यवरांसह व्यवस्थापन मंडळाचे सदस्य आणि अभ्यास मंडळाच्या सदस्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या सोहळ्यात विद्यापीठाच्या विविध अधिविभागातील १०६२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करुन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे आणि परीक्षा नियंत्रक डॉ. ज्योत्स्ना पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रका...