क्रीडामंत्री मुंबई बैठक बातमी कराड वार्ता न्यूज मुंबई, ता. ५ : ऑलिम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव यांच्या स्मरणार्थ गोळेश्वर (ता. कराड) येथे

क्रीडामंत्री मुंबई बैठक बातमी कराड वार्ता न्यूज

मुंबई, ता. ५ : ऑलिम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव यांच्या स्मरणार्थ गोळेश्वर (ता. कराड) येथे शासनाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती क्रीडा संकुल आराखड्याचे सादरीकरण राज्याचे क्रीडामंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्यासमोर करण्यात आले. याप्रसंगी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले प्रमुख उपस्थित होते. यावेळी क्रीडामंत्र्यांनी या आराखड्याचे कौतुक करुन, क्रीडा संकुलाच्या कामाला तातडीने गती देण्याचे आदेश प्रशासनाला दिले. 
 
कराड तालुक्यातील गोळेश्वर येथील पैलवान खाशाबा जाधव यांनी भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले. त्यांच्या या कार्याचे स्मरण व्हावे आणि त्यापासून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, यासाठी पैलवान खाशाबा जाधव यांच्या गोळेश्वर गावी त्यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती क्रीडा संकुल उभारण्याचा शासनाने निर्धार केला आहे. या संकुलाच्या कामाला लवकरात लवकर प्रारंभ व्हावा, यासाठी कराड दक्षिण विधानसभेचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले प्रयत्नशील आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी याप्रश्नी शासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन, क्रीडा संकुलाच्या सद्यस्थितीबाबत माहिती घेतली होती. तसेच शासनस्तरावर संकुलाच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा सुरु ठेवला आहे.

मुंबईत क्रीडामंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रीडामंत्री ना. भरणे यांच्यासमोर या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. मुंबईतील शशी प्रभू ॲन्ड असोसिएटस्‌ यांनी या कुस्ती क्रीडा संकुलाचा आराखडा तयार केला असून, बैठकीत सिनीअर आर्किटेक्ट अमृता पारकर यांनी या आराखड्याचे सादरीकरण केले. कुस्तीसाठी निश्चित केलेले आंतरराष्ट्रीय स्टँटर्ड लक्षात घेऊन हा आराखडा तयार केल्याचे अमृता पारकर यांनी सांगितले. 

दरम्यान, क्रीडामंत्री ना. दत्तात्रय भरणे यांनी या आराखड्याचे कौतुक करुन, या क्रीडा संकुलामुळे ग्रामीण भागातील उदयोन्मुख खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. त्यासाठी या संकुलाच्या कामाला तातडीने गती द्यावी. तसेच आवश्यक त्या पातळीवर तांत्रिक मान्यतेचे आदेश देण्यासाठी कार्यवाही करण्याची ग्वाही त्यांनी दिली. याप्रसंगी कराडच्या तहसीलदार कल्पना ढवळे व तालुका क्रीडा अधिकारी संगीता जगताप उपस्थित होत्

मुंबई : ऑलिम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव कुस्ती क्रीडा संकुल आराखड्याचे सादरीकरण पाहताना क्रीडा मंत्री ना. दत्तात्रय भरणे. बाजूस आ.डॉ. अतुलबाबा भोसले, तहसीलदार कल्पना ढवळे, क्रीडा अधिकारी संगीता जगताप व अमृता पारकर.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त