सातारा पुणे मार्गावरील पाचवड फाट्या पासून 5 किलोमीटर अंतरावरील वडाचे मसवे म्हणून कुडाळ विभागातील मोठे गाव
सातारा पुणे मार्गावरील पाचवड फाट्या पासून 5 किलोमीटर अंतरावरील वडाचे मसवे म्हणून कुडाळ विभागातील मोठे गाव या गावाला सामाजिक राजकीय व सहकार शैक्षणिक असा मोठा वारसा लाभला आहे.
कलकत्ता येथील बॉटनीक गार्डन सारख्या ठिकाणी 5 एकर क्षेत्रात वडाच्या झाडाची नोंद आहे. या गावच्या प्रवेशद्वारावर भव्य व जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणा जवळ असे वडाच भव्य दिव्य झाड आहे.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी लक्ष घालून येथील या पुरातन झाडाच्या परिसरात विकासात्मक कामे करावीत अशी मागणी होत असून पर्यटन दर्जा लाभलेल्या वडाच्या मसवे गावात शासकीय पातळीवर दखल घेवून या ठिकाणी जास्तीत जास्त विकासासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे येथील महिलांनी केली असून सुस्त असलेल्या वनविभागाने आज वटपौर्णिमेच्या दिवशी विकासासाठी प्रयत्न करण्याची मागणी महिला वर्गातून होत आहे.... .
मोहन जगताप
Comments
Post a Comment