*झालेल्या पावसाने बांबू लागवडीसाठी जमीन उत्तम**बांबू लागवड करावी**-जिल्हाधिकारी संतोष पाटील*कराड वार्ता न्युज

*झालेल्या पावसाने बांबू लागवडीसाठी जमीन उत्तम*
*बांबू लागवड करावी*
*-जिल्हाधिकारी संतोष पाटील*कराड वार्ता न्युज
सातारा दि.9 – जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असून ओढ्या नाल्याना पाणी वाहत आहे. बांबू लागवडीसाठी जमीनही उत्तम झाली असून कृषि, सामाजिक वनीकरण विभागाने तातडीने बांबू वृक्षाची लागवड करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.  
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बांबू लागवड अभियान विषयक आढावा बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.  बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उप वन संरक्षक आदीती भारद्वाज, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे, यांच्यासह आदी  उपस्थित होते.  
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत कराड, पाटण खंडाळा, कोरेगाव, जावली या तालुक्यांमध्ये 46.30 हेक्टरवर 31 हजार  738 बांबू वृक्षाची लागवड करावयाची आहे. ही लागवड लवकरात लवकर पुर्ण करावी. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमार्फत बांबू लागवड करावयाची आहे.  या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ज्या विभागांना दिलेले बांबू लागवडीचे उद्दीष्ट शंभर टक्के पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिले.
000

Comments

Popular posts from this blog

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी

कराड पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी ग्रामविकास मंत्री सकारात्मक

कराड राज्य उत्पादन शुल्कचा जवान लाचलुचपतच्या जाळ्यात