सामाजिक बांधिलकी जपत तांबवेच्या शिबिरात 50 युवकांनी केले रक्तदान
कराड वार्ता न्यूज नेटवर्क
तांबवे : शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर तांबवे (ता. कराड) येथे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील युवा संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात येथील पन्नास युवकांनी रक्तदान केले.
तांबवे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शुक्रवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
तांबवे गेली सलग आठ वर्षांपासून प्रदीप पाटील मित्र मंडळ व कराड येथील यशवंतराव चव्हाण रक्त पेढी यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबीर घतले जाते.छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम एक सामाजिक बांधिलकी म्हणून घेतला जातो. रक्तदान करणारे युवकांना एक छत्री व प्रशस्तिपत्र देण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन सरपंच जयश्री कबाडे,उपसरपंच अँड विजयसिंह पाटील, रयत सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदीप पाटील, वैभव शिंदे, नितीन पवार, नितीन फल्ले, श्रीकांत पवार, विक्रम पाटील, संभाजी पवार, संभाजी शिंदे, विलास पाटील, गुणवंत पाटील, सुरेश देसाई यासह अंगणवाडी सेविका, आशा सेविका, शिक्षक उपस्थित होते. .
Comments
Post a Comment