माउली’च्या जयघोषाने लोणंदनगरी दुमदुमली
प्रशासनाचा माऊली पालखी तळावर गोधळ नियोजनाचा अभाव
पुणे जिल्ह्यातील आपला प्रवास संपवून सातारा जिल्ह्यात वैष्णवांचा मेळा दाखल.
फुलाची चादर टाकून रंग रांगोळी काढून केले माऊलीचे स्वागत
दर्शन रांगेच्या बद्दला मुळे भक्ता मध्ये प्रंचड गोंदळ तुफान गर्दी पोलीस प्रशासनाचे दुलक्ष
लोणंद प्रतिनिधी- अक्षय दोशी
हरिनामाच्या जयघोषात आणि टाळ-मृदुंगांच्या गजरात गुरुवारी दुपारी दिड वाजता श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने निरा नदीकाठी पुणे जिल्ह्यातील आपला प्रवास संपवून निरा नदीवरील जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून मार्गक्रमण करत टाळ मृदुंगाच्या साथीत मोठ्या आनंदाने भक्तिमय वातावरणात सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. पालखी सोहळयाचे प्रवर्तक हैबतबाबांची भूमी असलेल्या सातारा जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर निरा नदीवरील माऊली भक्तांनी टाळ मृदुंगाच्या गजरात आणि माऊली माऊली च्या जयघोषात जलतुषार आणि फुलांच्या वर्षावात प्रसिद्ध दत्तघाट या ठिकाणी माऊलींच्या पादूकांना निरा स्नान घालण्यात आले. यावेळी सातारा पोलीस दल तसेच खंडाळा रेस्क्यू टीम यांच्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
साधु संत येती घरा
तोचि दिवाळी दसरा’
या उक्तीप्रमाणे अनेक ठिकाणी वारकरी व भाविकांच्या जेवणासाठी लांबच लांब पंगती बसल्याचे दिसत होते. घराघरांतून माउलींना वाजतगाजत नवद्य नेण्यात येत होते. आपल्या गावी माउलींचे आणि संतांचे वास्तव्य असल्याने आजचा दिवस लोणंदसाठी जणू दसरा-दिवाळी सणासारखा सात्त्विक आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. पंढरीच्या वाटेवर नुसते ज्ञानोबा-तुकाराम म्हटले तरी कोणीही उपाशी राहात नाही असे म्हटले जाते त्याचे आज माउलींच्या गावी लोणंद मुक्कामी दिसून येत होते.
लोणंद पंढरीचा वास चंद्रभागे स्रान, आण दर्शन विठोबाचे, हेचि घडो मज जन्मजन्मांतरी, मागणे श्रीहरी नाही दुजे...
सातारा जिल्ह्याच्या वतीने नीरा नदीच्या काठी पाडेगाव दत्त घाट येथे माऊलींचे निरा स्नान संपन्न झाल्यानंतर पाडेगाव जुना टोलनाका येथे जिल्हा परिषद सातारा व खंडाळा तालुक्याच्या वतीने संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर पालखी महाराज सोहळ्याचे साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई, मदत पुरणवसन मंत्री मकरंद पाटील ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे जिल्हातील आमदार खासदार उपस्थित राहणार आहे तथा जिल्हाधिकारी संतोष पाटील , मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, जिल्हा पोलिसप्रमुख तुषार दोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत तहसीलदार अजित पाटील, तालुका आरोग्य अधिकारी अविनाश पाटील, बिडीओ वाघमार
यावेळेस सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे मान्यवरांनी तसेच हजारो भाविकांनी दर्शन घेतले. माऊलीच्या दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी उसळली होती. हरिनामाच्या गजरात आणि टाळ मृदुंगाच्या निनादात पालखी सोहळ्यात भाविक तल्लीन झाले होते. यानंतर पालखी सोहळा लाखो वारकऱ्यांसह आपल्या मुक्कामाच्या ठिकाणाकडे लोणंदच्या दिशेने मार्गस्थ झाला.
फोटो
1. लोणंद पालखी तळावर समाज आरती करण्यात आली
2. सामाज आरती पूर्वी भोंगा वाजवण्यात आला
Comments
Post a Comment