तालुकास्तरावर मोफत पाठ्यपुस्तके वितरण शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी मिळणार मोफत पाठ्यपुस्तके

तालुकास्तरावर मोफत पाठ्यपुस्तके वितरण
 शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी मिळणार मोफत पाठ्यपुस्तके                     

‌‌तांबवे - सर्व शिक्षा अभियानांतर्गत दिल्या जाणारी मोफत पाठ्यपुस्तक तालुकास्तरावरती उपलब्ध झालेले आहेत. सर्व स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद व नगरपालिका प्राथमिक शाळा,सर्व अनुदानित खाजगी माध्यमिक व प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व  विद्यार्थ्याना केंद्र सरकार व राज्य शासनाच्या वतीने मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. चालू 2025/2026 शैक्षणिक वर्षातील मोफत पाठ्यपुस्तकाचे ४३२५१ संच उपलब्ध झाले आहेत.जिल्हा स्तरावरुन तालुकास्तरावर प्राप्त झाले त्याचे केंद्र स्तरावर वितरण करण्यात आले असले ची माहिती गटशिक्षणाधिकारी बिपिन मोरे यांनी दिली.
जिल्हापरिषद , नगरपालिका व सर्व अनुदानित, अंशतः अनुदानित माध्यमिक व खाजगी प्राथमिक शाळेतील सर्व मुला मुलींना ही मोफत पाठ्यपुस्तकाचे शाळेच्या पहिल्या दिवशी वितरण केलं जातं. चालु शैक्षणिक वर्षासाठी एकुण ४३२५१ पुस्तकाचे संच उपलब्ध झाले आहेत. यामध्ये इयत्ता पहिलीसाठी 4928 संंच,इयत्ता दुसरीसाठी 4928 संच,इयत्ता तिसरी साठी 4928संच, इयत्ता चौथीसाठी 5402 संच,इयत्ता पाचवीसाठी 5630 संच,इयत्ता सहावीसाठी 5459संच, इयत्ता सातवी साठी 5771 संच,इयत्ता आठवीसाठी 6205 संच असे  एकूण 43251 पुस्तकाच संच तालुकास्तरावरती प्राप्त झाले आहेत.याचे तालुकास्तरावर केंद्रस्तरावरती याचं वाटप करण्यात आले आहे.कराड तालुक्यातील 24 केंद्रांमध्ये सध्या या पुस्तकाचं वाटप सुरू आहे आणि केंद्रस्तरावरून शाळा सुरू होण्यापूर्वी या पाठ्यपुस्तकाचे शाळा स्तरावर वाटप होणार आहे.इयता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्याना शाळेच्या पहिल्या दिवशी या मोफत पाठ्यपुस्तके वितरण शालेय व्यवस्थापन समिती चे सदस्ययांच्या उपस्थित करावयाचे आहे.तालुकास्तरावर  गटशिक्षणाधिकारी बिपिन मोरे ,शिक्षण विस्तार अधिकारी नितीन जगताप,जमिला मुलाणी, निवास पवार,शालेय पोषण आहार अधीक्षक विजय परीट याचबरोबर सर्व केंद्रप्रमुख, केंद्र समन्वयक, गट साधन केंद्रातील सर्व कर्मचारी शिक्षक उपस्थित होते.   
*********
कोट- 
केंद्र शासन व राज्य शासन यांच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका व सर्व‌‌‌अनुदानित अंशतः अनुदानित माध्यमिक व खाजगी प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीच्या  सर्व विद्यार्थ्याना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात.यावर्षी ही शाळेच्या पहिल्या दिवशी ही मोफत पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत.
    बिपिन मोरे 
गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कराड.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त