दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांकडून स्पर्धेचे आयोजन. संजीवनी विद्यामंदिर येथे शिक्षक दिन साजरा.

दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांकडून स्पर्धेचे आयोजन. संजीवनी विद्यामंदिर येथे शिक्षक दिन साजरा.


सह्याद्री वार्ता कराड वार्ता न्युज नेटवर्क
शेणोली ( ता. कराड) : शिक्षणातून चांगले संस्कार घ्या.आदर्शवादी जीवन जगल्यास समजात मान मिळतो.शालेय वयात चांगले वाईट समजून घेतले तर अडचणी निर्माण होत नाहीत असे मत संजीवनी विद्यामंदिर चे शिक्षक भाऊराव पोटकुले यांनी व्यक्त केले. ते संजीवनी विद्यामंदिर येथे आयोजित विविध बक्षीस समारंभ व शिक्षक दिनाच्या निमित्ताने बोलत होते.शाळेचे इयत्ता दहावी व ग्रामीण व कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयातील कृषिदूतांच्या वतीने हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. एस. निकम कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.सरस्वती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. यावेळी श्री पोटकुले म्हणाले,” शिक्षणातून चांगले संस्कार घ्या. चांगला विचार देण्याचा आणि घेण्याचा प्रयत्न करा. .मुख्याध्यापक व्ही.एस. निकम म्हणाले,” पूर्वीच्या काळी ची शिक्षण व्यवस्था जाचक होती. मिळणारे शिक्षण व्यवस्थित घेता येत नव्हतं. पण आता शिक्षणाची दारे खुले आहेत. विद्यार्थ्यांनी भरपूर शिकायला हवं.प्रा.विजय लोहार म्हणाले,”आयुष्यात सातत्याने चांगले ज्ञान घेण्याचा प्रयत्न करावा. समाजाने सातत्याने सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांचे आभार मानणे गरजेचे आहे.त्यांनी चिखल गोळे जर अंगावर झेलले नसते तर आज मुलींना शिक्षणाची कवाडे खुली झाली नसती. यावेळी कृषिदूत शंतनू कडेकर, यांनी आपले मनोगत व्यक्त केली. दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाच्या व संजीवनी विद्यामंदिर यांच्या वतीने आयोजित केलेल्या निबंध व  वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया कणसे हिने केले. राजवीर बनसोडे याने आभार  मानले.यावेळी मुख्याध्यापक व्ही. एस. निकम,व्ही,वाय,साठे,प्रा. विजय लोहार, व्ही. व्ही.निकम, एस. एस. यादव,बी.बी.पोटकुले आर.आर. मोरे ,ए.एम.नदाफ,संजय माने, दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ.के.एस.घुटूकडे, प्रा.व्ही.व्ही.माने यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी कृषीदूत शंतनू कडेकर,आदित्य बागल, प्रणय जाधव,रोहन होले, रोहित अंकली ,अनिकेत केंगार यांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.