कराड वार्ता सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड प्रशासनाची विनंती मान्य करत शनिवारी निघणारा मूक मोर्चा रद्द*

*प्रशासनाची विनंती मान्य करत शनिवारी निघणारा मूक मोर्चा रद्द*

सातारा दि.15  पुसेसावळी ता. खटाव येथील घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शनिवार दि. 16 सप्टेंबर रोजी काढण्यात येणारा मूक  मोर्चा  प्रशासनाने केलेल्या विनंती नुसार रद्द करण्याचा निर्णय संबंधित सामाजिक संघटनांनी घेतला आहे.

पुसेसावळी येथे घटनेच्या निषेधार्थ अनेक सामाजिक संघटनानी मुक मोर्चा काढण्याची भूमिका घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समिर शेख यांनी सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींशी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन गणेशोत्सवाचा सण तोंडावर असल्याने कोणत्याही प्रकारचे सामाजिक अशांतता निर्माण होऊ नये. यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. संघटनांनी मोर्चा काढू नये, अशी विनंती केली होती. या विनंतीला  सकारात्मक प्रतिसाद देत संघटनांनी उद्या शनिवार दि. 16 सप्टेंबर रोजी काढण्यात येणारा मूक मोर्चा रद्द केला आहे.

Comments

Popular posts from this blog

सातारा जिल्ह्यात शिवसेना भक्कम करणार शिवसेनेचे सातारा जिल्हा समन्वयक राजेंद्रसिह यादव यांचा निर्धार

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

कराड दक्षिणमधील ११ गावे सौर हायमास्ट दिव्यांनी उजळणार