' *कराड दक्षिण' मध्ये काँग्रेसची निघणार गावागावात जनसंवाद पदयात्रा*

कराड वार्ता सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड

' *कराड दक्षिण' मध्ये काँग्रेसची निघणार गावागावात जनसंवाद पदयात्रा* 

कराड: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळाला. केरळ ते जम्मू काश्मीरपर्यंत देश पादाक्रांत करत राहुल गांधी यांनी काँग्रेसचा हात बळकट केला. आता गाव-तालुका स्तरावर काँग्रेसची वज्रमूठ साकारण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने जनसंवाद पदयात्रा निघाली आहे. उद्यापासून कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात जनसंवाद पदयात्रेला सुरुवात होत आहे. "यात्रा संवादाची, बांधिलकी लोक भावनेची" असा गजर करत काँग्रेसचे कार्यकर्ते गावोगावी जाणार आहेत.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा पश्चिम महाराष्ट्रात संपन्न होत आहे. त्यानुसार आ. पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिण मध्ये १६ सप्टेंबर रोजी सुरु होणाऱ्या पदयात्रेत सहभागी होणार आहेत. यावेळी कराड दक्षिणच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांनी केले. १६ सप्टेंबर रोजी सुरु होणारी यात्रा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणातील गावागावात जाणार आहे. 

उद्या १६ सप्टेंबर रोजी चचेगाव येथून संध्याकाळी ४ वाजता या पदयात्रेस सुरुवात होणार आहे तेथून विंग, शिंदेवाडी, घारेवाडी, कोळे फाटा, कोळे येथे जाऊन या पदयात्रेची सांगता होऊन कोळे येथे जाहिर सभा होणार आहे. तसेच १७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ४ वाजता कराड शहरातील कार्वे नाका येथून ऑलम्पिकवीर स्व. खाशाबा जाधव यांच्या स्मारकास अभिवादन करून यात्रेला सुरुवात होणार आहे तसेच पुढे हि पदयात्रा कार्वे, कोडोली, दुशेरे येथून जाऊन शेरे गावात सांगता सभा होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील 'रयतेचे राज्य व फुले, शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्टाचे पुरोगामित्व अबाधित ठेवणे, शांतता ठेवणे. संविधान टिकवणे आणि सामाजिक ऐक्य कायम राखणे. जाती-धर्मात द्वेष व फुट पाडण्याचे षडयंत्र मोडून काढून 'नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान' हा राहुल गांधी यांनी राबविलेला प्रेमाचा संदेश घरोघरी पोहचवणे. महागाई आणि भ्रष्टाचारा विरोधात आवाज उठवणे. बेरोजगारी विरोधात आवाज उठवणे. सध्या देशातील राजकीय, सामाजिक, धार्मिक स्थिती बिघडत चालली आहे. त्या विरोधात काँग्रेस आपली भूमिका घेऊन भाजपचा खोटा चेहरा समोर आणण्यासाठी गावोगावी जाणार आहे. भाजपच्या विरोधात यात्रेच्या माध्यमातून रान उठवणार आहे.

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.