खासदार श्रीनिवास पाटील यांनी सुचवलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या कराड व पाटण तालुक्यातील जलसंधारणाच्या कामावरील स्थगिती


     खासदार श्रीनिवास पाटील यांनी सुचवलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या कराड व पाटण तालुक्यातील जलसंधारणाच्या कामावरील स्थगिती राज्य शासनाकडून उठवण्यात आली आहे. त्यानुसार कराड व पाटण तालुक्यातील १६ कामांसाठी सुमारे ५ कोटी ८१ लाखाचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे अनेक दिवसापासून प्रलंबित असणा-या सदर कामांचा प्रश्न मार्गी लागल्याने स्थानिकांना दिलासा मिळाला आहे.
      सातारा लोकसभा मतदारसंघातील विविध ठिकाणच्या जलसंधारणाच्या कामासाठी खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून यापूर्वी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला होता. मात्र संबंधित कामांवर स्थगिती आल्याने ही कामे प्रलंबित राहीली होती. आता राज्य शासनाने कामावरील स्थगिती उठवल्याने त्या कामांना गती प्राप्त झाली आहे. 
     यामध्ये कराड तालुक्यातील वहागाव व तळबीड येथे सिमेंट कॉंक्रिट बंधारा बांधणे ह्या दोन कामासाठी ५९ लक्ष ५० हजार ३६३ रूपये निधी मंजूर झाला आहे. अंतवडी (खिंड शिवार), अंतवडी (पोळ खडी शिवार), अंतवडी (रत्नकर शिवार), अंतवडी (टेक शिवार), अंतवडी (नाईकबा मंदीर शेजारी), डिचोली बाबरमाची (विठ्ठल कोळेकर विहिर), आबईचीवाडी येथील एकूण ८ कामासाठी २ कोटी ८७ लाख ६१ हजार ५२४ रूपये,
पाटण तालुक्यातील टेळेवाडी (टेक शिवार) व टेळेवाडी (दोधानी शिवार) येथील सिमेंट कॉंक्रिट बंधार्‍यासाठी ७४ लाख ३६ हजार २६०, 
मालदन (बाधे शिवार), मालदन (बाधे शिवाराच्या मागे), खळे, जांभूळवाडी (जिल्हा परिषद शाळेच्या मागे) ह्या ४ कामासाठी १ कोटी ६० लक्ष १० हजार ५४० एवढा निधी मंजूर झाला आहे. अशी माहिती मृद व जलसंधारण विभागाचे सहा. जिल्हा जलसंधारण अधिकारी यांनी खा.पाटील यांना कळवली आहे. या जलसंधारणाच्या विकासकामांमुळे कराड, पाटण तालुक्यातील शेती सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे. तसेच संबंधित भागातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी लागणार्‍या पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत मिळणार आहे.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त