कराड *इंडियन स्वच्छता लीग 2.0, स्वच्छता महाअभियान*



 कराड *इंडियन स्वच्छता लीग 2.0, स्वच्छता महाअभियान* 

 कराड वार्ता सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड
इंडियन स्वच्छता लीग 2.0 आणि स्वच्छतेचा पंधरावडा च्या ‘युथ वर्सेस गार्बेज’या थीम अंतर्गत कृष्णा नदी पात्रात कराड नगर परिषदेतर्फे प्रभारी मुख्याधिकारी श्री.संजय गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता महाअभियान घेण्यात आले. या वेळी जलनिस्सारण अभियंता श्री. अशोक पवार  यांनी प्रास्ताविक केले. आरोग्य अभियंता श्री. आर.डी.भालदार यांनी स्वच्छतेची शपथ घेऊन या अभियानास सुरुवात केली. इंडियन स्वच्छता लीग २.० ही स्पर्धा स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरामुक्त शहरांसाठी तरुणांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्यावतीने आयोजित करण्यात आली आहे.  स्वच्छ भारत अभियानांतर्गत इंडियन स्वच्छता लीग या अभियानात देशातील ३०८५ शहरांचा सहभाग असून महाराष्ट्रातील एकूण ४११ शहरांचा यात समावेश आहे.आपल्या कराड शहराची स्वच्छता ही उत्तम असली पाहिजे.आणि ती कायम टिकून राहण्यासाठी प्रयत्न कराड नगरपालिका करत असते. या महाअभियानासाठी कराड शहराने  "कराड सुपर जायंट्स" या नावाने स्पर्धेत सहभाग घेतला. स्वच्छता महाअभियानामध्ये  टीम कराड सुपर जायंट्सच्या ब्रँड अँबेसिडर मधुरा किरपेकर,कराड शहरातील संत तुकाराम हायस्कूल,यशवंत हायस्कूल, सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज,दौलतराव अहिरे कॉलेज,कन्याप्रशाला या शाळा व  महाविद्यालयचे विद्यार्थी, एनव्हायरो फ्रेंड्स नेचर क्लब, कराड अर्बन बँक, कॅनरा बँक, विजय दिवस समारोह समिती, शिवाजी उद्यान ग्रुप, पाटीदार ग्रुप, क्रेडाई ग्रुप,इंजिनिअर्स व आर्किटेक्ट असोसिएशन या संस्था आणि नागरिकांनी या अभियानात मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन सहकार्य केले. कृष्णा नदीपात्र परिसरातील गवत, झुडपे, कचरा काढून परिसर स्वच्छ करण्यात आला. कराड नगरपरिषद आरोग्य अभियंता श्री.आर.डी.भालदार,जल निस्सारण अभियंता श्री ए.आर.पवार, शहर समन्वयक अतिशय रोकडे  हेड मुकादम,मुकादम,कर्मचारी आणि कराड नगरपरिषद जनजागृती टीम या स्वच्छता महाभियानात सहभागी होते.
ULB CODE 802870
Clean karad, Green karad
#Swachhsurvekshankara2023
#MajhiVasundharaAbhiyaan
#KaradMunicipalCouncil
#MajhiVasundharaAbhiyan
#MajhiVasundhara
#gogreen
#MyCleanIndia
#GreenBuildingCertified
#greenfestival
#SolidLiquidWasteManagement
#Swachhata #swachhataHiSeva
#ecofriendlydiwali
#Epledge
#ODFPlus
#BiodegradableWasteMangement
#karadmunicipalcouncil
#environment
#HarGharJal
#MyCityMyPride #3R #GarbageFree #AzadiKaAmritMahotsav #SwachhBharatMission #SwachhBharatUrban #MaharashtraDGIPR 
#swachhsurvekshan2023 #swachhmaharashtramissionurban
#स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव
#swachhmaharashtramisson
@CMOMaharashtra 
@pmoindia
@panchamahabhute जर
#HaraGeelaSookhaNeela
#indianswachhataleague
#Daosatara

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त