सातारा स्वतःच्या चुकीचे खापर इतरांच्या डोक्यावर फोडण्याची विरोधकांना सवयच : शिक्षक नेते बलवंत पाटील

सातारा स्वतःच्या चुकीचे खापर इतरांच्या डोक्यावर फोडण्याची विरोधकांना सवयच : शिक्षक नेते बलवंत पाटील 

शिक्षक बँकेच्या रविवारच्या वार्षिक सभेच्या पार्श्वभूमीवर बलवंत पाटील यांची विरोधकांवर टीका


सातारा,(प्रतिनिधी): अनावश्यक नोकर भरती करून यापूर्वीच्या संचालक मंडळातील काही जबाबदार घटकांनी बेजबाबदारपणा केला, मात्र न्यायालयाच्या आदेशाने कमी केलेल्या २६ पैकी २५ कर्मचाऱ्यांना त्यांनी परत कामावर हजर करून घेतले व त्यामुळे संबंधित कर्मचारी कामावर हजर नसताना १८ महीन्याचा पगार त्यांना देण्यात आला त्यामुळे बँकेला कोट्यावधी रुपयांचा तोटा सहन करावा लागला, त्याचा बोजा सभासदांवरच पडला, मात्र स्वतः केलेल्या चुकांचे खापर इतरांच्या डोक्यावर फोडण्याची विरोधकांना सवयच आहे, अशी खोचक प्रतिक्रिया शिक्षक बँकेचे माजी चेअरमन व शिक्षक नेते बलवंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.


 रविवार दि.१० सप्टेंबर रोजी शिक्षक बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा साताऱ्यात होत असून त्या पार्श्वभूमीवर पूर्वीच्या संचालक मंडळातील काही जबाबदार व्यक्तींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते प्रसिद्धीमाध्यमांशी बोलत होते.                

अनावश्यक नोकर भरती प्रकरणी आर्थिक देवाण- घेवाणीच्या कारणावरून हटवादी भूमिका घेऊन न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून स्टार्फंग पॅटर्नचा वापर न करणारांना योग्य तो धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 
श्री. बलवंत पाटील पुढे म्हणाले की, नोकर भरतीबाबत फौजदारी गुन्हा दाखल केला असतानाही अनाहूत प्रश्न उपस्थित करणारी मंडळी पुन्हा पुन्हा तोच गुन्हा करत आहेत. 'बँकेत भरती करणार नाही' असे आश्वासन दिले असतानाही नियमबाहय 44 नविन कर्मचाऱ्यांची भरती केली.
सदर भरतीचा स्टार्फीग पॅटर्न 37 इतका असताना 44 जणांची भरती करण्यात आली. तसेच त्यासाठी कोणाही जबाबदार अधिकाऱ्यांची परवानगी घेतली नाही. त्यातही भरीस भर म्हणजे संबंधित सर्वच कर्मचाऱ्यांना अवघ्या 6 महीन्यातच नोकरीमध्ये कायम केले. आधीचे 25 व नंतर चे 44 अशा 69 कर्मचाऱ्यांचा एकुण 4.89 कोटीचा बोजा बँकेवर व पर्यायाने सभासदांवर पडला आहे. अनावश्यक नोकर भरती केल्याने सेवक खर्चात मोठया प्रमाणात वाढ झाली.

'चुकीची दुबार शाखा पध्दती चालु ठेवल्याने 7 ते 8 कोटींनी तोटा वाढला. चुकीच्या पध्दतीने व नियमबाहय पदोन्नती कर्मचा-यांना देण्यात आल्या. तसेच चुकीच्या पध्दतीने व नियमबाहय रितीने कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याचा आरोपही श्री. बलवंत पाटील यांनी केला आहे.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त