वडगांव ज.स्वा.ता.खटाव येथील हुतात्मा स्मारकास आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले अभिवादन.

*वडगांव ज.स्वा.ता.खटाव येथील हुतात्मा स्मारकास आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले अभिवादन.*

ब्रिटिश सरकार विरोधात निघालेल्या वडूज तहसील कार्यालयावरील मोर्चात जयराम स्वामी वडगाव, पुसेसावळी आणि उंचीठाणे येथील 9 क्रांतीकारकांना हौतात्म्य आले होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वडगाव ज.स्वा. येथील हुतात्मा स्मारकास प्रतिवर्षीप्रमाणे *राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.आमदार बाळासाहेब पाटील* यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

प्रारंभी सर्व हुतात्म्यांच्या निवासस्थानी आमदार बाळासाहेब पाटील यांनी भेट देऊन हुतात्म्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, खटाव तालूका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष नंदकुमार मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्रदादा पवार, प्रा.बंडा गोडसे, सी.एम.पाटील, सुरेश पाटील, सुहास पिसाळ, अनिल माने, सौ.सुनीता मगर, संभाजी थोरात, प्रांताधिकारी सौ.उज्वला गाडेकर, तहसीलदार प्रशांत जाधव, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, पोलीस उपनिरीक्षक अक्षय चिकणे, सरपंच योगिता कुंदप, उपसरपंच शुभांगी घाडगे, वसंतराव घार्गे(गुरुजी), संजय भोसले, रमेश बेलवडेकर, नाना गायकवाड, सुहास शिंदे, विजय घार्गे, संतोष घार्गे, दुटाळ सर, रविंद्र घार्गे, मारुती  पवार, कमलाकर घार्गे, विठ्ठलस्वामी महाराज, डॉ.विकास घार्गे, राजू घार्गे, हणमंत भोसले, नंदकुमार देशमुख, पांडुरंग घार्गे तसेच जयराम स्वामी विद्यामंदिरातील शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी व ग्रामस्थ उपस्थित होते.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या सुपुत्रांनी हौतात्म्य पत्कारले त्या शूर वीरांच्या स्मरणार्थ दि. 9 सप्टेंबर रोजी हुतात्मा दिन साजरा केला जातो. ब्रिटिश सरकार विरोधात निघालेल्या वडूज तहसील कार्यालयावरील मोर्चात जयराम स्वामी वडगाव, पुसेसावळी आणि उंचीठाणे येथील 9 क्रांतीकारकांना हौतात्म्य आले होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वडगाव ज.स्वा. येथील हुतात्मा स्मारकास माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार बाळासाहेब पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.