कराड नगरपरिषद कराड *इंडियन स्वच्छता लीग, 2.0,मेगा वॉकेथॉन* "स्वच्छता पंधरवडा" व "स्वच्छता ही सेवा"

कराड नगरपरिषद कराड *इंडियन स्वच्छता लीग, 2.0,मेगा वॉकेथॉन* "स्वच्छता पंधरवडा" व "स्वच्छता ही सेवा" या अभियान अंतर्गत कराड नगरपरिषद व सह्याद्री हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हृदय दिन आज निमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले .सकाळी 6.30 वाजता रॅलीची सुरवात सह्याद्री हॉस्पिटल- जुना कोयना पूल - शाहू चौक- दत्त चौक - चावडी चौक मार्गे कृष्णाघाट या ठिकाणी संपन्न झाली. सह्याद्री हॉस्पिटलच्या स्टाफ ने प्रीतिसंगम बागे समोर पथनाट्य सादर केले त्या मध्ये आजच्या काळात हृदयविकाराच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. अनेक लोकांचा हृदयविकारामुळे मृत्यू झाला आहे. हल्ली प्रत्येकाची जीवनशैली पूर्णपणे बिघडली आहे. त्यामुळे हृदयविकाराच्या आजाराला सामोरे जावे लागते.हा दिवस साजरा करण्यामागचे कारण म्हणजे लोकांना हृदयविकारांबाबत जागरूक करणे आहे. हृदय रोग टाळण्यासाठी गरजेपेक्षा फास्ट फूड जास्त खाणे, साखर-मीठ व चरबीयुक्त पदार्थांचे अतिसेवन करणे तसेच कोणत्याही गोष्टीचा ताण घेणे बंद करायला हवे.भरपूर व्यायाम करावा.भरभर चालणे,धावणे, पोहणे, सायकल चालवने यासारखा व्यायाम करावा. ज्यांना ...