श्रीराम जानकी स्मृती आदर्श पत्रकार पुरस्कार’ वितरण सोहळा संपन्न
फोटो : जीवनधर चव्हाण, हरीष पाटणे, शरद महाजनी यांच्या हस्ते आदेश खताळ, पद्माकर सोळवंडे यांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यावेळी मिलिंद भेडसगावकर, विठ्ठल हेंद्रे व इतर. पत्रकारांनी सामाजिक भान ठेवावे : शरद महाजनी ‘श्रीराम जानकी स्मृती आदर्श पत्रकार पुरस्कार’ वितरण सोहळा संपन्न सातारा : पत्रकारांवरील प्रेम आणि पत्रकारितेबद्दलची कृतज्ञता जपून पत्रकार क्षेत्रात काम केले. आता नव्या युगात पत्रकारितेची विश्वासार्हता जपण्याचे आणि जोपासण्याचे काम प्रिंट मीडियाला निर्धाराने करावे लागेल. पत्रकारांनी सामाजिक भान ठेवून वाटचाल करावी. विविध विषयांवर लेखन करताना सामाजिक जाणीव ठेवणे आवश्यक आहे. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लेखणी प्रसंगी कठोर व मृदूही झाली पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार शरद महाजनी यांनी केले. महाजनी परिवाराकडून देण्यात येणार्या श्रीराम जानकी स्मृती पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे दै. ‘पुढारी’ सातारा कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष व दै. ‘पुढारी’चे वृत्तसंपादक हरी...