कराड शहरात आज विविध विकास कामाचा धुमधडाक्यात शुभारंभ करण्यात आला न्युज अस्लम मुल्ला
कराड शहरात आज विविध विकास कामाचा धुमधडाक्यात शुभारंभ करण्यात आला कराड शहरातील शनिवार पेठ चिगळे सर्जिकल ते श्रीराम हॉस्पिटल पाठीमागील भागात रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ करण्यात आला यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव बाबा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक विजय वाटेगावकर स्मिता हूलवान निशांत ढेकळे ओमकार मुळे किरण पाटील गजेंद्र कांबळे विजयसिंह यादव भाऊ नुरुल मुल्ला राहुल खराडे तसेच येथील स्थानिक रहिवासी उपस्थित होते या सर्वांचे आभार शिवसेना व यशवंत विकास आघाडी यांच्या वतीने मानण्यात आले तसेच कराड नगरपरिषद हद्दीत डॉक्टर सुहास पाटील ते यश एम्पायर पर्यंत खडीकरण डांबरीकरण करणे या कामाचा शुभारंभ करण्यात आला. कराड नगरपरिषद वाढीव भाग येथील वजनात कलेक्शन ते महापूरे घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे या कामाचा देखील शुभारंभ करण्यात आला तसेच शनिवार पेठ महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ते शिवाप्पा खांडेकर घरापर्यंत रस्ता काँक्रेटकरण करणे या कामाचा देखील शुभारंभ आज करण्यात आला एकंदरीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री शंभूराजे देसाई यांच्या माध्यमातून व यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव बाबा यांच्या पाठपुराव्यामुळे कराड शहरात होत असलेल्या विविध विकास कामाबद्दल कराड शहरातील नागरिकांनी यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव बाबा व सर्व नगरसेवक यांच्या आभार मानले आहेत
Comments
Post a Comment