मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते

मुंबई न्युज कराड वार्ता सह्याद्री वार्ता ग्रुप अस्लम मुल्ला 9021358931

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मंत्रालयातील समिती सभागृहात झाले. एखाद्या घटनेची वस्तुनिष्ठता तपासूनच माध्यमांनी बातमी द्यावी. बातमीला सनसनाटी स्वरुप देणे माध्यमांनी टाळावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी केले.

यावेळी विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे, माहिती व जनसंपर्कचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, मंत्रालय आणि विधिमंडळ संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, उपाध्यक्ष महेश पवार, सरचिटणीस प्रवीण पुरो, खजिनदार विनोद यादव आदी उपस्थित होते.

पुरस्कार्थींची नावे :

कै. कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार- 
जेष्ठ पत्रकार श्री. पंढरीनाथ सावंत (सन २०२३) आणि श्रीमती ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी (सन २०२४)

राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सन २०२३ : 
मुद्रित माध्यम - लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार संदिप आचार्य, लोकसत्ता
वृत्तवाहिनी –पत्रकार विनया देशपांडे, सीएनएन आयबीएन
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार वार्ताहर संघ सदस्य –ज्येष्ठ पत्रकार दीपक भातुसे, लोकमत, मुंबई

राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सन २०२४ :
मुद्रित माध्यम –ज्येष्ठ पत्रकार प्रगती पाटील, लोकमत सातारा
वृत्त वाहिनी –  मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे
वार्ताहर संघाच्या संदस्यांमधून दिला जाणार पुरस्कार : राजन शेलार, पुढारी, मुंबई
0000

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी