साताऱ्याच्या जान्हवीने योगविश्वा मध्ये एकाच वेळी बारा विश्वविक्रम करत रचला इतिहास; कराड वार्ता न्युज नेटवर्क

*साताऱ्याच्या जान्हवीने योगविश्वा मध्ये एकाच वेळी बारा  विश्वविक्रम करत रचला इतिहास;अमेझिंग ओलंपिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची झाली नोंद*  साताऱ्याच्या डाॅ.जान्हवी जयप्रकाश इंगळे या  या युवतीने एकाच वेळी 12 वेगवेगळ्या योगा आसनांमध्ये विश्वविक्रम प्रस्थापित केले आहेत. प्रत्येक आसनांचा होल्डिंग टाईम वेगळा असल्यामुळे या विश्वविक्रमांची नोंद अमेझिंग ऑलंम्पिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र आणि गोल्ड मेडल जान्हवी यांना प्राप्त झाले आहेत.... 

कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये एकाच वेळी 12 विश्वविक्रम प्रस्थापित करणाऱ्या सातारा येथील डॉक्टर जान्हवी इंगळे या पहिल्या  युवती ठरल्या आहेत. 12 आसनांमध्ये भुजंगासन 3 मिनिटे 9 सेकंद, अंजनेयासन 1मिनिटे 8सेकंद ,भद्रासन 30 मिनिटे 10 सेकंद, उष्ट्रासन 2 मिनिटे 4 सेकंद,बालासन 10 मिनिटे 27सेकंद,फलकासन 1 मिनिटे 1 सेकंद, उत्तान मंडूकासन 7 मिनिटे 5 सेकंद,जानु सिरसासन 1 मिनिटे 12 सेकंद,पर्वतासन 3 मिनिटे 6सेकंद,वृक्षासन 3 मिनिटे 6सेकंद , गुप्त पद्मासन 7मिनिटे 12 सेकंद ,गोमूखासन 10 मिनिटे 12सेकंद या आसनांमध्ये स्थिर राहून आपला विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.   

डॉ.जान्हवी इंगळे या जान्हवी कि योगशाळेच्या संस्थापिका असून यांनी या आधीही 5 तास 1 मिनिट 17 सेकंदाचा सिद्धासन आसन करत पहिला जागतिक विश्वविक्रम केला आहे. तर दुसरा जागतिक विश्वविक्रम  नऊवारी साडी परिधान करून 1 तास 19 मिनिटे 34 सेकंद हा 10 हजार वेळा तितली क्रिया केल्याची नोंद करण्यात झाली आहे. तर तिसरा विश्वविक्रम हा 8 तास 13 मिनिटे 21 सेकंद सुप्त बद्ध कोनासन करून हे विश्वविक्रम आपल्या नावावर नोंदवले आहेत.  त्या राष्ट्रीय योगा ब्रॅण्ड अम्बेसिडर असून अनेक सामूहिक आणि वैयक्तिक विश्वविक्रम त्यांच्या नावावर नोंद झाले आहेत.  

तसेच आतंरराष्ट्रीय योगिनी पुरस्कार हरिद्वार , स्वामी विवेकानंद योग रत्न सन्मान, महर्षी घेरंड ऋषी सन्मान, महाराष्ट्र हिरकणी सन्मान,माॅं जिजाऊ सन्मान,मेजर ध्यानचंद क्रिडा रत्न सन्मान,लंडन बुक ऑफ रेकॉर्ड पुरस्कार,  महर्षी पतंजली योग रत्न सन्मान, राष्ट्रीय योग रत्न सन्मान,  विश्वरत्न सन्मान, महाराष्ट्र खेल पुरस्कार,नवदुर्गा पुरस्कार, राष्ट्रीय योगिनी समाज भूषण पुरस्कार,प्राईड ऑफ इंडिया ,द बेस्ट योग गुरू, आंतरराष्ट्रीय योगाचारिणी सन्मान,योग प्रियदर्शनी सन्मान , सातारा भूषण पुरस्कार,प्राईड ऑफ पुणे पुरस्कार अशा साडे तीनशे हून अधिक अनेक आंतरराष्ट्रीय राज्यस्तरीय, राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे...  या बारा विश्वविक्रमांची नोंद अमेझिंग ऑलंम्पिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्यानंतर जान्हवी यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे..

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त