वाचन संकल्प महाराष्ट्राचा" हा उपक्रम महाराष्ट्र राज्याला चालना देणारा - प्रा. डॉ. दादाराम साळुंखे

"वाचन संकल्प महाराष्ट्राचा" हा उपक्रम महाराष्ट्र राज्याला चालना देणारा - प्रा. डॉ. दादाराम साळुंखे 
कराड - सैदापूर विद्यानगर येथील समाजभूषण बाबुराव गोखले सार्वजनिक ग्रंथालयामध्ये वाचन संस्कृती वाढवण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने १ ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" हा उपक्रम राबविण्यात आला. 
यावेळी बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. दादाराम साळुंखे म्हणाले, "वाचन संस्कृतीला चालना देणे ही काळाची गरज बनली आहे. वाचनाचा अभाव असल्यामुळे समाज भरकटण्याच्या स्थितीत आहे. अशावेळी वाचनाच्या माध्यमातून समाज योग्य मार्गावर येईल अशी आशा महाराष्ट्र सरकारला आहे. यामुळे त्यांनी "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" राबवून वाचन संस्कृतीला चालना दिली आहे .या उपक्रमाचा उद्देश वाचनाला प्रोत्साहन देऊन तरुण पिढीला ग्रंथालयाशी जोडणे आणि वाचन संस्कृती अधिक बळकट करणे हा आहे. विद्यार्थ्यांना वाचन आणि लेखनाच्या विविध पैलूंची माहिती व्हावी या उद्देशाने लेखक व विद्यार्थ्यांमध्ये व वाचकांच्यामध्ये संवाद घडवून आणता येतो. आज "परीक्षण एका ग्रंथाचे" या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जे पुस्तक परीक्षण केले आहे, विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांचा अभ्यास करून आपल्या ज्ञानात भर  घालाने हे या उपक्रमाचे उद्दिष्ट होते .ते मुलांनी पूर्ण करण्यास मराठी भाषेतील अनेक चांगल्या पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. लेखकाने निर्माण केलेले वांग्मय कोणत्या परिस्थितीत लिहिले आहे  त्यांच्या  साहित्यात आलेले अनुभव प्रत्यक्ष तो वाचकांसमोर मांडतो तेव्हा वाचकाला यातून ज्ञानही मिळते. व तो विविध पुस्तके वाचण्यास व लिहिण्यास प्रवृत्त होतो. संपूर्ण भारतातून पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याने वाचा संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम राबवला आहे वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम खऱ्या अर्थाने राज्याला चालना देणार आहे. यावेळी स.गा. म प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सरस्वती विद्यालय व कन्या शाळा कराड येथील मुलांनी ग्रंथालयाने घेतलेल्या विविध उपक्रमात सहभाग घेतला. तसेच त्यांनी क्रमांकही पटकावले. यावेळी प्रसिद्ध वक्ते अभयकुमार देशमुख यांनी "परीक्षण एका ग्रंथाचे "या स्पर्धेचे बक्षीस वितरण करून मनोगत व्यक्त केले. प्रा. डॉ. संतोष लाड यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते मधुकर पवार यांनी ग्रंथालयास ग्रंथ भेट दिले यावेळी ग्रंथालयाचे संचालक  अभिजीत इंगळे, मा.सुनीता जाधव , प्रा. अभय चव्हाण ,प्रा. विलास सुर्वे प्रा. अनुराधा जाधव प्रा. पल्लवी पाटील ,सुमन पवार, सागर पवार, प्राजक्ता पवार , प्रणिता पवार ,देवांशी पवार, सिंधू चव्हाण, शाळेतील शिक्षक वृंद ग्रंथपाल रुकसाना नदाफ सीमा कांबळे ग्रंथालयाचे सभासद वाचक उपस्थित  होते. कार्यक्रमाचे आभार ग्रंथालयाचे अध्यक्ष सौ. कांचन धर्मे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी