माणुसकीचा झरा रामकृष्ण वेताळ कर्तुत्ववान व्यक्तिमत्वाचा उद्या 10 जानेवारीला विविध उपक्रमांनी साजरा होणार वाढदिवस ओगलेवाडीःकराड वार्ता सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क
भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मा. रामकृष्ण वेताळ साहेब यांचा वाढदिवस 10 जानेवारी रोजी विविध उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे.
सकाळी वडील श्रीमंतराव आणि मातोश्री इंदुमती यांचे दर्शन घेतल्यानंतर ते सुर्ली ता. कराड येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन करणार आहेत.यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले जाणार आहे. यानंतर सुर्ली ता. कराड येथे वृक्षारोपण करून ते पूर्णवेळ शुभेच्छा स्वीकारणार आहेत.
कराड वार्ता संपादक अस्लम मुल्ला मित्र परिवार यांच्या वतीने साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आनंदराज फार्म,खंबाळेपाटी सुर्ली ता.कराड येथे शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत. दुपारी 11.00 नंतर सर्वांसाठी प्रीतीभोजनाचे आयोजन सुर्ली ता. कराड या ठिकाणी केले आहे. अशा भरगच्च कार्यक्रमाची रेलचेल 10 जानेवारी रोजी श्री वेताळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली आहे. वाढदिवसासाठी शुभेच्छा देताना हार, फुले,गुच्छ घेऊन येऊ नये त्या ऐवजी शैक्षणिक साहित्य घेऊन यावे. असे आवाहन रामकृष्ण वेताळ युवा मंच कराड उत्तर या संयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment