Posts

Showing posts from March, 2025

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा*कराड वार्ता न्युज

Image
दि. 29 मार्च 2025. *उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा*कराड वार्ता न्युज *नववर्ष राज्याच्या प्रगतीला नवी दिशा देवो;* *सामाजिक ऐक्यासह बंधुत्व अधिक दृढ होवो* *-उपमुख्यमंत्री अजित पवार* मुंबई, दि. 29 : वसंत ऋतूच्या आगमनासोबत साजरा होणारा गुढीपाडवा हा नवचैतन्य, नवनिर्मिती, नवउत्साह आणि नवसंकल्पांचा सण आहे. मराठी नववर्षाच्या या मंगलप्रसंगी जनतेच्या जीवनात भरभराट, आरोग्य, आनंद आणि समृद्धी नांदो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, गुढीपाडवा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा एक महत्वपूर्ण सण आहे. घरोघरी गुढी उभारून आणि गावातून-शहरातून शोभायात्रांचे आयोजन करून मराठी माणूस हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. हे मराठी नववर्ष राज्याच्या प्रगतीला नवी दिशा देवो, सामाजिक ऐक्य आणि बंधुत्व अधिक दृढ होवो. नव्या संकल्पांनी प्रेरित होऊन आपण सर्वजण महाराष्ट्राच्या विकासासाठी एकजुटीने योगदान देऊया. ...

*कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचे 15 ते 17 एप्रिल कालावधीत आयोजन**-पालकमंत्री शंभूराज देसाई* कराड वार्ता न्युज

Image
*कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचे 15 ते 17 एप्रिल कालावधीत आयोजन* *-पालकमंत्री शंभूराज देसाई* कराड वार्ता न्युज सातारा दि.29-डोंगरी भागातील शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेतीची माहिती होण्यासाठी कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचे 15 ते 17 एप्रिल 2025 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कराड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.   पालकमंत्री श्री, देसाई म्हणाले, महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग, कृषी उत्पन्न बाजार समिती पाटण व जिल्हा प्रशासनाच्यावतीने दौलत नगर येथे कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये कृषी प्रदर्शनाबरोबर पशुपक्षी प्रदर्शनाचे हे आयोजन करण्यात येणार आहे.  या प्रदर्शनामध्ये महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाचे स्टॉलही असणार आहेत. कोयना दौलत डोंगरी महोत्सवामध्ये घोडेस्वार, वॉटर स्पोर्ट, इलेक्ट्रिक बग्गी यांचा पर्यटन वाढीसाठी वापर करण्यात येणार आहे. कोयना दौलत डोंगरी महोत्सवाच्या सांगता कार्यक्रम यामध्ये महाराष्ट्राची लोकधारा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. कोय...

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

Image
आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन कराड, ता. २६ :कराड वार्ता न्युज  कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचा वाढदिवस शुक्रवार दि. २८ मार्च रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त २८ मार्च ते ६ एप्रिलपर्यंत कराड शहर व ग्रामीण भागात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (ता. २८) कोयना वसाहत (ता. कराड) येथील कृष्णा इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्रांगणावर शुभेच्छा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यादिवशी दुपारी ४.३० वाजता आ.डॉ. भोसले यांचे मुंबईहून कराड विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर कृष्णा हॉस्पिटलमधील सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या पुतळ्यास अभिवादन करून, ते सायंकाळी ६ वाजलेपासून कृष्णा स्कूलच्या प्रांगणात शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहतील. यावेळी नागरिकांनी हार, तुरे, बुके न आणता शालेपयोगी साहित्य शुभेच्छा स्वरूपात आणावे, असे आवाहन वाढदिवस संयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे. दरम्यान, शुक्रवारी (त...

कराडच्या उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णाशी उद्धट वागणाऱ्या जडगे मॅडम यांना करण्यात आले तात्काळ कार्यमुक्त

Image
माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांचा आक्रमक पवित्रा उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांना जागेवरच केले पदमुक्त उपचारातील दिरंगाईबद्दल राजेंद्रसिंह यादव यांनी घेतला आक्रमक पवित्रा, रूग्णालयाची केली पाहणी  स्व. वेणूताई चव्हाण रूग्णालयामध्ये रूग्णांची हेळसांड होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी उपजिल्हा रूग्णालयात जावून याबाबत तात्काळ जाब विचारला व अधिकार्‍यांची झाडाझडती घेतली. त्यावर संबधित वैद्यकीय अधिकार्‍यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे रूग्णांच्या जीवाशी खेळणार्‍या अधिकार्‍यांवर जोपर्यंत कार्यवाही होत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही. असा आक्रमक पवित्रा राजेंद्रसिंह यादव यांनी घेतला. घटनेचे गांभीर्य ओळखून संबंधित वैद्यकीय अधिकार्‍यांना तात्काळ पदमुक्त करण्याची कारवाई करण्यात आली. यावेळी माजी नगरसेविका स्मिता हुलवान, गजेंद्र कांबळे, प्रितम यादव, निशांत ढेकळे, विनोद भोसले, मनोज माळी आदी उपस्थित होते. दरम्यान, स्व. वेणूताई चव्हाण रूग्णालयामधील वैद्यकीय अधिकार्‍यांचा मनमानी कारभार, रूग्णालयात असण...

कार्वे येथील आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद : चौदाशेहून अधिक नागरिकांची मोफत तपासणी* कराड वार्ता समूह

Image
*कार्वे येथील आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद : चौदाशेहून अधिक नागरिकांची मोफत तपासणी* कराड वार्ता समूह  *कार्वे* : कोणताही आजार अंगावर काढू नये वैद्यकीय तंत्रज्ञान प्रगत झाले असल्याने कोणत्याही आजारावार तात्काळ उपचार होण्यासाठी तपासणी आवश्यक आहे. त्यामुळे स्वतः च्या आरोग्याची काळजी स्वतः प्राथमिकतेने घेतली पाहिजे यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्वे येथे केले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त कार्वे येथे आयोजित आरोग्य शिबिरात जवळपास चौदाशेहुन अधिक नागरिकांनी सहभाग नोंदविला. यावेळी कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे, माजी पं स सदस्य नामदेवराव पाटील, इंद्रजित चव्हाण, कार्वेचे माजी सरपंच वैभव थोरात, शब्बीर मुजावर, काँग्रेसचे डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.विलास थोरात, रंगराव थोरात, विष्णू हुलवान, विठ्ठल हुलवान, माणिकतात्या थोरात, प्रल्हाद हुलवान, सुजित थोरात, भगवान सुतार, अशोकराव थोरात, साहेबराव थोरात, जिना मुलाणी, संतोष थोरात, अनिकेत घाडगे, रोहित थोरात, सल...

कराड तालुक्यातील वाठार हायस्कूल येथील श्री गणेश पेट्रोलियम येथे पेट्रोल पंपावर कामासाठी कामगार पाहिजे

Image
कराड तालुक्यातील वाठार हायस्कूल येथील श्री गणेश पेट्रोलियम येथे पेट्रोल पंपावर काम करण्यासाठी मुले व मुली पाहिजे तरी कराड तालुक्यातील काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या मुले व  मुलींनी या मोबाईल नंबर वर संपर्क करा मोबाईल नंबर 87 67 38 11 14 व 82 0 80 89003

.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले समाधीस्थळी अभिवादन*

Image
*स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले समाधीस्थळी अभिवादन*  कराड वार्ता न्युज दि. १२ मार्च  - महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त कराड येथील प्रिती संगमावरील समाधीस्थळावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, आण्णासाहेब पाटील, आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार अतुल भोसले, मनोज घोरपडे, सचिन पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराज आदी उपस्थित होते.   *स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा आदर्श घेऊन सर्वसामान्यांना न्याय देणार- अजित पवार*   महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेल्या आदर्श विचारांवरच राज्य शासन काम करीत आहे. त्यांच्या विचारांच्या माध्यमातूनच सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम शासन करीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाला घेऊन स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी समाजामध्य...

वाचन संस्कृती आजच्या काळाची गरज संपादक अस्लम मुल्ला।

Image
वाचन संस्कृती आजच्या काळाची गरज  संपादक अस्लम मुल्ला।  वाचन संस्कृती ही आजच्या काळाची गरज बनली असून आजच्या पिढीने वाचन संस्कृती बरोबर संवाद ठेवला तर नक्कीच भविष्यात  तरुण पिढी आपल्या आयुष्याला आदर्शवादी दिशा देऊ शकेल असे प्रतिपादन कराड वार्ताचे संपादक असलंम मुल्ला यांनी केले विद्यानगर  येथील  समाजभूषण बाबुराव गोखले ग्रंथालयाला नुकतीच सदिच्छा भेट दिली यावेळी ग्रंथपाल  रुकसाना नदाफ  सीमा कांबळे यांनी अनमोल असे पुस्तक भेट देऊन अस्लम मुल्ला यांचे  स्वागत केले विद्यानगर भागात  ग्रंथालय सुरू करून तरुण पिढीला ज्ञान उपयोगी भांडार पुस्तक रुपी स्वरूपात उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रंथालयातील सर्वांचे असलंम  मुल्ला  यांनी आभार मानले  परिसरातील मुला मुलींनी या ग्रंथालयाला भेट देऊन आपल्या आयुष्यात संसार उपयोगी ज्ञानाचा वापर अवश्य करून घ्यावा असे आवाहन असलंम मुल्ला यांनी केले

सीमा लढ्यातील रणरागिणी : आमच्या मातोश्री स्व. शांताबाई देसाई* कराड वार्ता न्युज अस्लम मुल्ला

Image
*सीमा लढ्यातील रणरागिणी : आमच्या मातोश्री स्व. शांताबाई देसाई* कराड वार्ता न्युज अस्लम मुल्ला आज 8 मार्च महिला दिन.  आम्ही देसाई बंधू कराड. सर्व महिलांना आमच्या कुटुंबातर्फे  आमच्या मातोश्री, प्रेरणास्थान स्वर्गीय शांताबाई श्रीरंग देसाई यांनी सुमारे ६५ वर्षांपूर्वी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सक्रीय भाग घेतला होता. बेळगाव, बिदर, भालकी, कारवारसह प्रदेश महाराष्ट्रात यावा, यासाठी त्या बेळगावमध्ये झालेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. बरोबर लहान मुलगी असतानाही सीमा भागातील मराठी बांधवांना न्याय मिळण्यासाठी त्या आंदोलनात उतरल्या होत्या. या आंदोलनामध्ये स्वर्गीय शांताबाई श्रीरंग देसाई यांना बेळगाव येथे पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी त्यांची रवानगी बेळगाव येथील रंगुबाई पॅलेस येथे राजकीय कैदी म्हणून करण्यात आली होती. तेथे त्यांनी तीन महिने कारावास भोगला. त्यावेळी आमची पाच वर्षांची मोठी बहीण पण  तिच्यासोबत होती. यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात उतरून आमच्या आईने धैर्य आणि करार...

जयवंत शुगर्स’ला राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार प्रदान

Image
‘जयवंत शुगर्स’ला राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार प्रदान नवी दिल्ली येथे ‘शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन’तर्फे आयोजित कार्यक्रमात सन्मान कराड, ता. ४ : धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्सने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन, उच्च दर्जाची साखर निर्मिती करण्यासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत, दि शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया या सर्वोच्च संस्थेकडून ‘जयवंत शुगर्स’ला राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘जयवंत शुगर्स’ला मिळालेला हा १७ वा पुरस्कार असून, या सन्मानामुळे जयवंत शुगर्सच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जयवंत शुगर्स’ने नेहमीच ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या हिताचा कारभार करत, साखर उद्योग क्षेत्रात मोलाची कामगिरी बजाविली आहे. ‘जयवंत शुगर्स’ने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत साखरेच्या उत्पादनातील वाढ, अन्य उपपदार्थांची निर्मिती व वाढत्या साखर उताऱ्यात सातत्य राखून, साखर उद्योगात उत्तुंग भरारी घेत एक आदर्श निर्माण केला आहे. कारखान्याच्या या महत्वपूर्ण योगदानाची...