उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा*कराड वार्ता न्युज

दि. 29 मार्च 2025.
*उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा*कराड वार्ता न्युज

*नववर्ष राज्याच्या प्रगतीला नवी दिशा देवो;*
*सामाजिक ऐक्यासह बंधुत्व अधिक दृढ होवो*
*-उपमुख्यमंत्री अजित पवार*

मुंबई, दि. 29 : वसंत ऋतूच्या आगमनासोबत साजरा होणारा गुढीपाडवा हा नवचैतन्य, नवनिर्मिती, नवउत्साह आणि नवसंकल्पांचा सण आहे. मराठी नववर्षाच्या या मंगलप्रसंगी जनतेच्या जीवनात भरभराट, आरोग्य, आनंद आणि समृद्धी नांदो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, गुढीपाडवा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा एक महत्वपूर्ण सण आहे. घरोघरी गुढी उभारून आणि गावातून-शहरातून शोभायात्रांचे आयोजन करून मराठी माणूस हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. हे मराठी नववर्ष राज्याच्या प्रगतीला नवी दिशा देवो, सामाजिक ऐक्य आणि बंधुत्व अधिक दृढ होवो. नव्या संकल्पांनी प्रेरित होऊन आपण सर्वजण महाराष्ट्राच्या विकासासाठी एकजुटीने योगदान देऊया. आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक प्रगतीच्या माध्यमातून महाराष्ट्र अधिक बळकट, समृध्द, संपन्न करूया, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
*****

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त