वाचन संस्कृती आजच्या काळाची गरज संपादक अस्लम मुल्ला।

वाचन संस्कृती आजच्या काळाची गरज 
संपादक अस्लम मुल्ला। 
वाचन संस्कृती ही आजच्या काळाची गरज बनली असून आजच्या पिढीने वाचन संस्कृती बरोबर संवाद ठेवला तर नक्कीच भविष्यात  तरुण पिढी आपल्या आयुष्याला आदर्शवादी दिशा देऊ शकेल असे प्रतिपादन कराड वार्ताचे संपादक असलंम मुल्ला यांनी केले
विद्यानगर  येथील  समाजभूषण बाबुराव गोखले ग्रंथालयाला नुकतीच सदिच्छा भेट दिली यावेळी ग्रंथपाल  रुकसाना नदाफ  सीमा कांबळे यांनी अनमोल असे पुस्तक भेट देऊन अस्लम मुल्ला यांचे  स्वागत केले
विद्यानगर भागात  ग्रंथालय सुरू करून तरुण पिढीला ज्ञान उपयोगी भांडार पुस्तक रुपी स्वरूपात उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रंथालयातील सर्वांचे असलंम  मुल्ला  यांनी आभार मानले  परिसरातील मुला मुलींनी या ग्रंथालयाला भेट देऊन आपल्या आयुष्यात संसार उपयोगी ज्ञानाचा वापर अवश्य करून घ्यावा असे आवाहन असलंम मुल्ला यांनी केले

Comments

Popular posts from this blog

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी

कराड पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी ग्रामविकास मंत्री सकारात्मक

कराड राज्य उत्पादन शुल्कचा जवान लाचलुचपतच्या जाळ्यात