*कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचे 15 ते 17 एप्रिल कालावधीत आयोजन**-पालकमंत्री शंभूराज देसाई* कराड वार्ता न्युज
*कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचे 15 ते 17 एप्रिल कालावधीत आयोजन*
सातारा दि.29-डोंगरी भागातील शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेतीची माहिती होण्यासाठी कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचे 15 ते 17 एप्रिल 2025 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कराड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पालकमंत्री श्री, देसाई म्हणाले, महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग, कृषी उत्पन्न बाजार समिती पाटण व जिल्हा प्रशासनाच्यावतीने दौलत नगर येथे कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये कृषी प्रदर्शनाबरोबर पशुपक्षी प्रदर्शनाचे हे आयोजन करण्यात येणार आहे.
या प्रदर्शनामध्ये महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाचे स्टॉलही असणार आहेत. कोयना दौलत डोंगरी महोत्सवामध्ये घोडेस्वार, वॉटर स्पोर्ट, इलेक्ट्रिक बग्गी यांचा पर्यटन वाढीसाठी वापर करण्यात येणार आहे. कोयना दौलत डोंगरी महोत्सवाच्या सांगता कार्यक्रम यामध्ये महाराष्ट्राची लोकधारा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचा डोंगरी विभागातील शेतकऱ्यांना लाभ होईल, असा विश्वासही पालकमंत्री देसाई यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
पत्रकार परिषदेपूर्वी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दौलत नगर येथे कोयना दौलत डोंगरी महोत्सवाच्या आयोजनासाठी जागेची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते
0000
Comments
Post a Comment