सीमा लढ्यातील रणरागिणी : आमच्या मातोश्री स्व. शांताबाई देसाई* कराड वार्ता न्युज अस्लम मुल्ला
आज 8 मार्च महिला दिन.
आम्ही देसाई बंधू कराड.
सर्व महिलांना आमच्या कुटुंबातर्फे
आमच्या मातोश्री, प्रेरणास्थान स्वर्गीय शांताबाई श्रीरंग देसाई यांनी सुमारे ६५ वर्षांपूर्वी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सक्रीय भाग घेतला होता.
बेळगाव, बिदर, भालकी, कारवारसह प्रदेश महाराष्ट्रात यावा, यासाठी त्या बेळगावमध्ये झालेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. बरोबर लहान मुलगी असतानाही सीमा भागातील मराठी बांधवांना न्याय मिळण्यासाठी त्या आंदोलनात उतरल्या होत्या.
या आंदोलनामध्ये स्वर्गीय शांताबाई श्रीरंग देसाई यांना बेळगाव येथे पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी त्यांची रवानगी बेळगाव येथील रंगुबाई पॅलेस येथे राजकीय कैदी म्हणून करण्यात आली होती. तेथे त्यांनी तीन महिने कारावास भोगला. त्यावेळी आमची पाच वर्षांची मोठी बहीण पण
तिच्यासोबत होती.
यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात उतरून आमच्या आईने धैर्य आणि करारी बाणा दाखवून दिला होता. आजच्या महिला दिनी स्त्रियांच्या कर्तृत्वाचा गुण गौरव होत असताना आमच्या आईचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.
तिने खूप खडतर कष्ट करून आम्ही चार भाऊ व दोन बहिणी यांचे पालन पोषण केले. सांसारिक कर्तव्य करताना सामाजिक कर्तव्यही तिने पार पाडले.
जुन्या काळातील सातवी असे तिचे शिक्षण होते. कोणताही गर्व न करता एक गृहिणी व शेती काम करत आम्हा मुलांचा सांभाळ केला. तिनेच आम्हाला आयुष्यात मोठे होण्याची प्रेरणा दिली. जन्मोजन्मी हीच आई आम्हाला मिळावी, ही स्वामींच्याकडे प्रार्थना.
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे पाईक असलेले आमचे देसाई कुटुंब. आमचे चुलते ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय श्री. आप्पासाहेब उर्फ ज्ञानदेव देसाई यांनी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेस कमिटी सदस्य म्हणून काम पाहिले. आमचे वडील स्वर्गीय श्रीरंग केशव देसाई
यांनी उदय कला गणेश मंडळ, मुळीक गल्ली, कराड या मंडळाचे वीस वर्षे अध्यक्ष म्हणून काम पाहिले.
आमचे बंधू श्री. भास्कर श्रीरंग देसाई हे कराड नगरपरिषद निवडणुकीत नगरसेवक म्हणून 2001 साली निवडून आले.
सौ. संगीता आनंदा देसाई यांनी 2011 मध्ये नगरसेविका व कराडच्या नगराध्यक्षा म्हणून काम पाहिले. आम्हा देसाई कुटुंबीयांना समाजकारणाचे हे बाळकडू आमच्या मातोश्री स्व. शांताबाई श्रीरंग देसाई यांच्यामुळेच मिळाले आहे.
आज महिला दिनानिमित्त
सर्व महिलांना देसाई कुटुंबाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.
Comments
Post a Comment