Posts

Showing posts from May, 2024

आई-वडील हे मुलांच्या शिक्षणासाठी खूप कष्ट घेतात. मात्र, त्यांच्या या कष्टाचे चीज मुलांनी केल्यानंतर याचे समाधान त्यांच्यासाठी मोलाचे असते. त्यामुळे स्वतःच्या भविष्यासह आई-वडीलांच्या घेतलेल्या कष्टाचे चीज मुलांनी करावे असे प्रतिपादन खा.श्रीनिवास पाटील यांनी केले.

Image
     कराड वार्ता समूह  आई-वडील हे मुलांच्या शिक्षणासाठी खूप कष्ट घेतात. मात्र, त्यांच्या या कष्टाचे चीज मुलांनी केल्यानंतर याचे समाधान त्यांच्यासाठी मोलाचे असते. त्यामुळे स्वतःच्या भविष्यासह आई-वडीलांच्या घेतलेल्या कष्टाचे चीज मुलांनी करावे असे प्रतिपादन खा.श्रीनिवास पाटील यांनी केले.     हावळेवाडी (ता.पाटण) येथील अदिती मनोज हावळे हीने दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवून घवघवीत यश मिळवले आहे. याबद्दल खा.श्रीनिवास पाटील यांनी तिचे व तिच्या पालकांचा सत्कार करून अभिनंदन केले. याप्रसंगी ते बोलत होते.      खा.श्रीनिवास पाटील म्हणाले, सर्व सामान्य कुटुंबातील अदितीने मिळवलेले यश कौतुकास्पद आणि इतरांसाठी प्रेरणादायी आहे. केवळ शिक्षणचं परिवर्तनाचे मुख्य साधन आहे. त्यातून स्वतःचे व समाजाचे परिवर्तन होऊन प्रगती होते. काळानुरुप शिक्षणाचे स्वरूप बदलत असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी तयार असणे गरजे आहे. शिक्षणाबद्दल पालकांच्यात सुद्धा जागृती झाली असून आपल्या मुलाच्या शिक्षणाकरिता ते अपार कष्ट उपसत आहेत. आई-वडिलांनी घेतलेल्या परिश्रमाचे जाणीव ठ...

कोणत्याही दबावाला बळी न पडता जिल्ह्यातील सर्व होर्डिंग्जचे स्टक्चरल ऑडिट करावे* - *जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Image
*कोणत्याही दबावाला बळी न पडता जिल्ह्यातील सर्व होर्डिंग्जचे स्टक्चरल ऑडिट करावे*   - *जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी    सातारा दि. 28 (जि.मा.का) :-  हवामान विभागाने सरासरी पेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे यंत्रणांनी सतर्क राहून व कोणत्याही दबावाला बळी न पडता जिल्ह्यातील सर्व होर्डिंग्जचे स्टक्चरल ऑडिट करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सून पूर्व आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी श्री. डुडी बोलत होते. या बैठकीसाठी नगरपालिकांचे मुख्याधिकारी, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, बांधकाम विभागांचे अधिकारी आदी सर्व यंत्रणा उपस्थित होत्या. जे होर्डिंग्ज नादुरुस्त आहेत, कमकुवत आहेत, खराब आहेत ते तात्काळ काढून टाकावेत, असे निर्देश देवून जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, जिल्ह्यातील अनधिकृत होर्डिंग्ज ज्यांच्या मालकीची आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत.  येत्या 5 जूनपर्यंत होर्डिंग्जच्या स्टक्चरल ऑडिटचे प्रमाणपत्र सादर करावे. त्याचबरोबर अनधिकृत होर्डिंग्जबाबत केलेल्या कार्य...

माणुसकीचा झरा विठ्ठलवाडी चा संतोष चव्हाण गावकऱ्यांनो काळजी करू नका मी आहे असा निश्चय मनाशी बाळगून गावासाठी धावला

Image
माणुसकीचा झरा विठ्ठलवाडी चा संतोष चव्हाण गावकऱ्यांनो काळजी करू नका मी आहे असा निश्चय मनाशी बाळगून गावासाठी धावला  तो म्हणजे कराड तालुक्यातील विठ्ठलवाडी चा जलदूत संतोष चव्हाण कडक उन्हामुळे गावाला पिण्याचा पाण्याचा पुरवठा करणारी विहीर आटली त्यामुळे गावकऱ्यांच्या समोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट  बनला गाव दुष्काळाने होरपळू लागले अशा वेळी गावासाठी आपण काहीतरी केले पाहिजे सामाजिक कार्याने प्रेरित झालेला संतोष चव्हाण गावाच्या मदतीसाठी धावला त्याने आपल्या स्वतःच्या शेतात असलेल्या विहिरीतून गावाला पाणी देण्याचा निर्णय घेतला अशावेळी त्याचे मित्र सदाशिव चव्हाण राजेंद्र करांडे श्रीपाद कुलकर्णी पीएनवीर आनंद वीर बाबा माने अमित वायदंडे योगेश बेडेकर यांनी सहकार्य केले पाईप एकत्र करण्यासाठी व जोडण्यासाठी प्रदीप चव्हाण भास्कर चव्हाण आकाराम चव्हाण सचिन पांढरे अक्षय दाभाडे लक्ष्मण चव्हाण चव्हाण यांनी पुढाकार घेतला तसेच विशेष सहकार्य माजी मुख्यमंत्री कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण गटाचे तमाजी चव्हाण व अतुल भोसले गटाचे शिवाजी मलगोंडे यांनी के...

Maharashtra 12th HSC Results 2024 Declared: बारावीचा निकाल जाहीर… मुलींनी मारली बाजी सहयाद्री वार्ता कराड वार्ता न्युज नेटवर्क

Maharashtra 12th HSC Results 2024 Declared: बारावीचा निकाल जाहीर… मुलींनी मारली बाजी  सहयाद्री वार्ता  कराड वार्ता न्युज नेटवर्क Maharashtra Board Class 12th Results 2024 Announced  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. MSBSHSE Maharashtra HSC 12th Board Result Passing Percentage  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदा बारावीचा निकाल ९३.३७ टक्के लागला आहे. सर्वाधिक ९७.५१ टक्के निकाल कोकण विभागाचा, तर मुंबई विभागाचा सर्वांत कमी ९१.९५ टक्के निकाल लागला.  बारावीचा निकाल 93.37 टक्के! कोकण विभागाची बाजी, मुंबईचा निकाल सर्वात कमी राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, माणिक बांगर या वेळी उपस्थित होते. यंदा बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्चदरम्यान घेण्यात आली. यंदा राज्यातील १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांन...

कृष्णा विद्यापीठाच्या प्रांगणात खास उभारलेल्या शामियानात हा दीक्षांत सोहळा रंगला.

Image
कराड, ता. १६ : सध्याच्या स्पर्धेच्या युगात झटपट यशासाठी अनेकजण शॉर्टकटचा मार्ग अवलंबितात. पण हा मार्ग अत्यंत घातक आहे. स्वतःला अधिक चांगले बनविण्यासाठी स्वतःशी स्पर्धा करा. जे काम कराल, त्यात सर्वोच्च योगदान द्या. देशाचे भविष्य तुमच्या खांद्यावर असून, तुमच्या सर्वांच्या अमूल्य योगदानामुळे देश निश्चितच उत्तुंग स्थानावर पोहचेल, असा विश्वास भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे माजी प्रमुख पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी व्यक्त केला. कृष्णा विश्व विद्यापीठाच्या १२ व्या दीक्षांत सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलपती डॉ. सुरेश भोसले होते.  कृष्णा विद्यापीठाच्या प्रांगणात खास उभारलेल्या शामियानात हा दीक्षांत सोहळा रंगला. पोलिस बॅन्डपथकाच्या मानवंदनेत प्रमुख पाहुण्यांना समारंभस्थळी नेण्यात आले. व्यासपीठावर कुलपतींचे प्रधान सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिनगारे, कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा, व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य श्री. विनायक भोसले, दिलीप पाटील, सौ. मनिषा मेघे, कार्यकारी संचालक पी. डी. जॉन, परीक्षा नियंत्रक डॉ. ज्योत्स्ना पाटील, संशोधन संचालक डॉ. डी. के....

देशाची भावी पिढी सुदृढ, निरोगी आणि संस्कारक्षम

Image
*देशाची भावी पिढी सुदृढ, निरोगी आणि संस्कारक्षम घडविण्याचे कार्य  शिक्षक करतात -प्रा डॉ  केशव मोरे                   सातारा प्रतिनिधी-      शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्याचा वापर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी करा.देशाची भावी पिढी सुदृढ, निरोगी आणि संस्कारक्षम घडविण्याचे कार्य  शिक्षक करतात ते काम निस्वार्थी व  प्रामाणिकपणे करावे असे प्रतिपादन केंद्र समन्वयक डाॅ. केशव मोरे यांनी केले.‌                     सातारा येथील आझाद काॅलेज ऑफ एज्युकेशन येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक यांचे शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रम सन २०२२-२४ या दोन वर्षांच्या शुभचिंतन कार्यक्रमावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्रा.सुधीर खरात होते. शुभचिंतन कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या तथा केंद्र संचालक वंदना नलवडे मॅडम यांनी सर्व छात्राध्यापकांना भविष्यकालीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.          या...

देशाची भावी पिढी सुदृढ, शिक्षक आणि संस्कारक्षम घडविण्याचे कार्य शिक्षक करतात -प्रा डॉ केशव मोरे*

*देशाची भावी पिढी सुदृढ, निरोगी आणि संस्कारक्षम घडविण्याचे कार्य  शिक्षक करतात -प्रा डॉ  केशव मोरे*                       सातारा प्रतिनिधी-      शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्याचा वापर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी करा.देशाची भावी पिढी सुदृढ, निरोगी आणि संस्कारक्षम घडविण्याचे कार्य  शिक्षक करतात ते काम निस्वार्थी व  प्रामाणिकपणे करावे असे प्रतिपादन केंद्र समन्वयक डाॅ. केशव मोरे यांनी केले.‌                     सातारा येथील आझाद काॅलेज ऑफ एज्युकेशन येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक यांचे शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रम सन २०२२-२४ या दोन वर्षांच्या शुभचिंतन कार्यक्रमावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्रा.सुधीर खरात होते. शुभचिंतन कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या तथा केंद्र संचालक वंदना नलवडे मॅडम यांनी सर्व छात्राध्यापकांना भविष्यकालीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.          यावेळ...