कोणत्याही दबावाला बळी न पडता जिल्ह्यातील सर्व होर्डिंग्जचे स्टक्चरल ऑडिट करावे* - *जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

*कोणत्याही दबावाला बळी न पडता जिल्ह्यातील सर्व होर्डिंग्जचे स्टक्चरल ऑडिट करावे*
  - *जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी 

  सातारा दि. 28 (जि.मा.का) :-  हवामान विभागाने सरासरी पेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे यंत्रणांनी सतर्क राहून व कोणत्याही दबावाला बळी न पडता जिल्ह्यातील सर्व होर्डिंग्जचे स्टक्चरल ऑडिट करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सून पूर्व आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी श्री. डुडी बोलत होते. या बैठकीसाठी नगरपालिकांचे मुख्याधिकारी, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, बांधकाम विभागांचे अधिकारी आदी सर्व यंत्रणा उपस्थित होत्या.
जे होर्डिंग्ज नादुरुस्त आहेत, कमकुवत आहेत, खराब आहेत ते तात्काळ काढून टाकावेत, असे निर्देश देवून जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, जिल्ह्यातील अनधिकृत होर्डिंग्ज ज्यांच्या मालकीची आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. 
येत्या 5 जूनपर्यंत होर्डिंग्जच्या स्टक्चरल ऑडिटचे प्रमाणपत्र सादर करावे. त्याचबरोबर अनधिकृत होर्डिंग्जबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवालही सादर करावा. मान्सून कालावधीत मनुष्य व पशुहानी होणार नाही याची सर्व यंत्रणांनी खबरदारी घ्यावी. सर्व गटारे स्वच्छ करावीत. नेहमी पूर येणाऱ्या भागात अधिकची काळजी घ्यावी. स्वच्छता मोहिम राबविताना सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी दिल्या.
0000000

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त