कृष्णा विद्यापीठाच्या प्रांगणात खास उभारलेल्या शामियानात हा दीक्षांत सोहळा रंगला.



कराड, ता. १६ : सध्याच्या स्पर्धेच्या युगात झटपट यशासाठी अनेकजण शॉर्टकटचा मार्ग अवलंबितात. पण हा मार्ग अत्यंत घातक आहे. स्वतःला अधिक चांगले बनविण्यासाठी स्वतःशी स्पर्धा करा. जे काम कराल, त्यात सर्वोच्च योगदान द्या. देशाचे भविष्य तुमच्या खांद्यावर असून, तुमच्या सर्वांच्या अमूल्य योगदानामुळे देश निश्चितच उत्तुंग स्थानावर पोहचेल, असा विश्वास भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे माजी प्रमुख पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी व्यक्त केला. कृष्णा विश्व विद्यापीठाच्या १२ व्या दीक्षांत सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलपती डॉ. सुरेश भोसले होते. 

कृष्णा विद्यापीठाच्या प्रांगणात खास उभारलेल्या शामियानात हा दीक्षांत सोहळा रंगला. पोलिस बॅन्डपथकाच्या मानवंदनेत प्रमुख पाहुण्यांना समारंभस्थळी नेण्यात आले. व्यासपीठावर कुलपतींचे प्रधान सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिनगारे, कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा, व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य श्री. विनायक भोसले, दिलीप पाटील, सौ. मनिषा मेघे, कार्यकारी संचालक पी. डी. जॉन, परीक्षा नियंत्रक डॉ. ज्योत्स्ना पाटील, संशोधन संचालक डॉ. डी. के. अगरवाल, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, मेडिकल अॅकडमिनिस्ट्रेटर डॉ. आर. जी. नानिवडेकर, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या सोहळ्यात विद्यापीठातील विविध अधिविभागातील १०४२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये १५ विद्यार्थ्यांना कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. तर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विविध अधिविभागात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या विद्यार्थ्यांना विशेष पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना डॉ. गंगाखेडकर पुढे म्हणाले, प्रत्येक व्यक्तीचे जीवन तुमच्या हातात आहे. यशसिद्धीसाठी मोठी स्वप्ने पहा. तसेच स्वप्नपूर्तीसाठी आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहून अपार कष्टाची तयारी ठेवा. जीवनात पैसा महत्वाचा नाही, तर जे काम कराल त्या कामाचे समाधान महत्वाचे आहे. विद्यापीठाला आणि देशाला अभिमान वाटेल असे काम तुमच्याकडून घडावे. 

अध्यक्षस्थानावरुन बोलताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, की कृष्णा विश्व विद्यापीठ ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून संशोधन, नवनिर्मितीला चालना देणारे ज्ञानकेंद्र आहे. कृष्णा विश्व विद्यापीठ आजच्या घडीला एकूण १३८ अभ्यासक्रम चालवते. कृष्णा हॉस्पिटलमध्ये सर्वप्रकारच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध असून, अत्याधुनिक पायाभूत सुविधा, उपकरणे आणि सुविधांसह सज्ज असलेली जागतिक दर्जाची न्यूरोसायन्स इन्स्टिट्यूट विकसित केली जात आहे. तसेच पुढील वर्षापासून २०० बेडचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरु केले जाणार असून, याठिकाणी हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी शस्त्रक्रियेसाठी रोबोटिक ऑपरेशन थिएटरसह अन्य सुविधांचा समावेश असणार आहे. आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण करण्यात कृष्णा विश्व विद्यापीठ नेहमीच अग्रेसर राहिले असून, ग्रामीण भागातील हजारो महिलांच्या कर्करोग तपासणी व उपचारासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. 

याप्रसंगी माजी आमदार आनंदराव पाटील, सौ. गौरवी भोसले, शिवाजीराव थोरात, कृष्णा वैद्यकीय विज्ञानच्या विभागप्रमुख डॉ. युगंतरा कदम, दंतविज्ञान विभागप्रमुख डॉ. शशिकिरण एन. डी., फिजिओथेरपीचे विभागप्रमुख डॉ. जी. वरदराजुलु, नर्सिंग विज्ञानच्या विभागप्रमुख डॉ. वैशाली मोहिते, अलाईड सायन्सचे विभागप्रमुख डॉ. गिरीश पठाडे, फार्मसीचे विभागप्रमुख डॉ. एन. आर. जाधव, अधिष्ठाता डॉ. सुप्रिया पाटील, डॉ. रेणुका पवार, डॉ. टी. पूविष्णू देवी, डॉ. ज्योती साळुंखे, डॉ. स्नेहल मसूरकर, डॉ. अक्षदा कोपर्डे, डॉ. स्वप्नाली शेडगे, डॉ. एस. आर. पाटील यांच्यासह विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, पालक, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट १

श्रेया मोहिते ४ पदकांची मानकरी

एमबीबीएस अधिविभागातील श्रेया हर्षवर्धन मोहिते या विद्यार्थीनीने सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी प्रदान करण्यात येणारे श्रीमती इंदुमती पांडुरंग दळवी पुरस्कार, डॉ. एम. ए. दोशी सुवर्णपदक, स्व. श्रीमती प्रभावती सोनटक्के सुवर्णपदक, मायक्रोबायोलॉजी सुवर्णपदक अशी एकूण ४ पदके पटकाविली. तसेच विद्यापीठातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी प्रदान करण्यात येणारे स्व. जयवंतराव भोसले सुवर्णपदक, तसेच श्रीमती जयमाला भोसले सुवर्णपदक कु. प्रवेका शिगली या विद्यार्थीनीने पटकाविले. 

फोटो ओळी १ :

कराड : कृष्णा विश्व विद्यापीठाच्या १२ व्या दिक्षांत सोहळ्यात सर्वाधिक पदके पटकाविणार्याओ श्रेया मोहिते या विद्यार्थीनीचा गौरव करताना कुलपती डॉ. सुरेश भोसले. बाजूस पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर, डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डॉ. प्रवीण शिनगारे, विनायक भोसले व अन्य मान्यवर.

फोटो ओळी २ :

कराड : कृष्णा विश्व विद्यापीठाच्या १२ व्या दिक्षांत सोहळ्यात बोलताना पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर. बाजूस कुलपती डॉ. सुरेश भोसले, डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डॉ. प्रवीण शिनगारे, डॉ. नीलम मिश्रा, विनायक भोसले, दिलीप पाटील, डॉ. ज्योत्स्ना पाटील, डॉ. एम. व्ही. घोरपडे व अन्य मान्यवर.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त