देशाची भावी पिढी सुदृढ, शिक्षक आणि संस्कारक्षम घडविण्याचे कार्य शिक्षक करतात -प्रा डॉ केशव मोरे*

*देशाची भावी पिढी सुदृढ, निरोगी आणि संस्कारक्षम घडविण्याचे कार्य  शिक्षक करतात -प्रा डॉ  केशव मोरे*                     
सातारा प्रतिनिधी-      शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्याचा वापर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी करा.देशाची भावी पिढी सुदृढ, निरोगी आणि संस्कारक्षम घडविण्याचे कार्य  शिक्षक करतात ते काम निस्वार्थी व  प्रामाणिकपणे करावे असे प्रतिपादन केंद्र समन्वयक डाॅ. केशव मोरे यांनी केले.‌                     सातारा येथील आझाद काॅलेज ऑफ एज्युकेशन येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक यांचे शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रम सन २०२२-२४ या दोन वर्षांच्या शुभचिंतन कार्यक्रमावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्रा.सुधीर खरात होते. शुभचिंतन कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या तथा केंद्र संचालक वंदना नलवडे मॅडम यांनी सर्व छात्राध्यापकांना भविष्यकालीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.         

यावेळी प्रमुख उपस्थितीत महाविद्यालयाच्या प्राचार्या तथा केंद्र संचालक डॉ. वंदना नलवडे, प्रा.डाॅ.विनय धोंडगे, प्रा.डाॅ के.आर.मोरे, प्रा. सुधीर खरात हे होते. डॉ. केशव मोरे म्हणाले, गेल्या दोन वर्षांत सुट्टीतील बी. एड. आपण छात्र अध्यापकांनी चांगल्या प्रकारे सर्व प्रात्यक्षिके,सराव पाठ घेऊन पूर्ण केले.या महाविद्यालयातील शिक्षण घेतलेले अनेक शिक्षक आज शासकीय सेवेत शिक्षणाधिकारी, प्राध्यापक, स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी पदावर कार्यरत आहेत.आपल्यापैकीही काही शिक्षक निश्चितीच स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी पदावर जातील. या महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेला प्रत्येक माजी विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या पदावर काम करीत आहे. प्रा. सुधीर खरात म्हणाले, रयत शिक्षण संस्थेचे आझाद काॅलेज ऑफ एज्युकेशन या महाविद्यालयात निश्चितच सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडविण्याचे काम केले जाते.यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठांतर्गत सेवेत असलेल्या शिक्षकांसाठी बी. एड. अभ्यासक्रम येथे गेले अनेक वर्षांपासून सुरू आहे.येथून शिक्षणशास्त्राची पदवी घेऊन बाहेर पडलेले अनेक शिक्षक आज अधिकारी पदावर कार्यरत आहेत. हे या महाविद्यालयातील प्राचार्यांपासून सर्व प्राध्यापकांनी ज्ञानार्जन केलेचे फलित आहे. शुभचिंतन कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या तथा केंद्र संचालक वंदना नलवडे मॅडम यांनी सर्व छात्राध्यापकांना भविष्यकालीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.         

यावेळी अतुल बोराटे, सुवर्णा साळवी, शुभांगी बोबडे, पांडुरंग शिंदे यांनी मनोगते व्यक्त केली.                           

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत दिपक पवार यांनी केले. सूत्रसंचालन गजानन देशमाने, प्रणिता गायकवाड व केशर माने यांनी केले व आभार प्रदिप रवलेकर यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त