आई-वडील हे मुलांच्या शिक्षणासाठी खूप कष्ट घेतात. मात्र, त्यांच्या या कष्टाचे चीज मुलांनी केल्यानंतर याचे समाधान त्यांच्यासाठी मोलाचे असते. त्यामुळे स्वतःच्या भविष्यासह आई-वडीलांच्या घेतलेल्या कष्टाचे चीज मुलांनी करावे असे प्रतिपादन खा.श्रीनिवास पाटील यांनी केले.


     कराड वार्ता समूह 
आई-वडील हे मुलांच्या शिक्षणासाठी खूप कष्ट घेतात. मात्र, त्यांच्या या कष्टाचे चीज मुलांनी केल्यानंतर याचे समाधान त्यांच्यासाठी मोलाचे असते. त्यामुळे स्वतःच्या भविष्यासह आई-वडीलांच्या घेतलेल्या कष्टाचे चीज मुलांनी करावे असे प्रतिपादन खा.श्रीनिवास पाटील यांनी केले.
    हावळेवाडी (ता.पाटण) येथील अदिती मनोज हावळे हीने दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवून घवघवीत यश मिळवले आहे. याबद्दल खा.श्रीनिवास पाटील यांनी तिचे व तिच्या पालकांचा सत्कार करून अभिनंदन केले. याप्रसंगी ते बोलत होते.
     खा.श्रीनिवास पाटील म्हणाले, सर्व सामान्य कुटुंबातील अदितीने मिळवलेले यश कौतुकास्पद आणि इतरांसाठी प्रेरणादायी आहे. केवळ शिक्षणचं परिवर्तनाचे मुख्य साधन आहे. त्यातून स्वतःचे व समाजाचे परिवर्तन होऊन प्रगती होते. काळानुरुप शिक्षणाचे स्वरूप बदलत असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी तयार असणे गरजे आहे. शिक्षणाबद्दल पालकांच्यात सुद्धा जागृती झाली असून आपल्या मुलाच्या शिक्षणाकरिता ते अपार कष्ट उपसत आहेत. आई-वडिलांनी घेतलेल्या परिश्रमाचे जाणीव ठेऊन मुलांनी स्वताला अभ्यासात झोकून द्यावे. शिक्षणाचा बदलता ट्रेंड लक्षात घेऊन तसे शिक्षण आत्मसात करावे. त्यासाठी लागणारी अतिरिक्त कौशल्य देखील शिकावीत. बाह्य स्पर्धेसाठी तयार होऊन आत्मविश्वासाने सामोरे जावे. जिद्द, मेहनत, सराव केल्याने यश नक्कीच मिळते.
     प्रारंभी शाल, श्रीफळ व शालोपयोगी साहित्य भेट देऊन अदिती व तिच्या पालकांचा सत्कार केला. यावेळी मनोज हावळे व रेश्मा हावळे उपस्थित होत्या.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त