माणुसकीचा झरा विठ्ठलवाडी चा संतोष चव्हाण गावकऱ्यांनो काळजी करू नका मी आहे असा निश्चय मनाशी बाळगून गावासाठी धावला
माणुसकीचा झरा विठ्ठलवाडी चा संतोष चव्हाण गावकऱ्यांनो काळजी करू नका मी आहे असा निश्चय मनाशी बाळगून गावासाठी धावला तो म्हणजे कराड तालुक्यातील विठ्ठलवाडी चा जलदूत संतोष चव्हाण कडक उन्हामुळे गावाला पिण्याचा पाण्याचा पुरवठा करणारी विहीर आटली त्यामुळे गावकऱ्यांच्या समोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनला गाव दुष्काळाने होरपळू लागले अशा वेळी गावासाठी आपण काहीतरी केले पाहिजे सामाजिक कार्याने प्रेरित झालेला संतोष चव्हाण गावाच्या मदतीसाठी धावला त्याने आपल्या स्वतःच्या शेतात असलेल्या विहिरीतून गावाला पाणी देण्याचा निर्णय घेतला अशावेळी त्याचे मित्र सदाशिव चव्हाण राजेंद्र करांडे श्रीपाद कुलकर्णी पीएनवीर आनंद वीर बाबा माने अमित वायदंडे योगेश बेडेकर यांनी सहकार्य केले पाईप एकत्र करण्यासाठी व जोडण्यासाठी प्रदीप चव्हाण भास्कर चव्हाण आकाराम चव्हाण सचिन पांढरे अक्षय दाभाडे लक्ष्मण चव्हाण चव्हाण यांनी पुढाकार घेतला तसेच विशेष सहकार्य माजी मुख्यमंत्री कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण गटाचे तमाजी चव्हाण व अतुल भोसले गटाचे शिवाजी मलगोंडे यांनी केले
या सर्वांच्या एकरूपाने सुमारे दोन किलोमीटरचे अंतर पूर्ण करीत पाणी विहिरीतून विठ्ठलवाडी गावात पोहोचले ग्रामस्थांनी अणदोत्सव साजरा केला संतोष चव्हाण व त्याच्या मित्र समूहाला धन्यवाद दिले विठ्ठलाच्या रूपाने आपल्या गावासाठी धावलेला संतोष चव्हाण व त्याच्या मित्र समूहाचे कार्य मोलाचे आहे पिण्याच्या पाण्यासाठी भर उन्हात पायपीट करणाऱ्या विठ्ठलवाडीच्या ग्रामस्थांना संतोष चव्हाण यांच्या रूपाने मोठा दिलासा मिळालाय जगात काय श्रेष्ठ आहे माणुसकी हेच संतोष चव्हाण व त्याच्या मित्र समूहाने दाखवून इतर गावांच्या समोर एक आदर्श निर्माण केला आहे
Comments
Post a Comment