माउली’च्या जयघोषाने लोणंदनगरी दुमदुमली
माउली’च्या जयघोषाने लोणंदनगरी दुमदुमली प्रशासनाचा माऊली पालखी तळावर गोधळ नियोजनाचा अभाव पुणे जिल्ह्यातील आपला प्रवास संपवून सातारा जिल्ह्यात वैष्णवांचा मेळा दाखल. फुलाची चादर टाकून रंग रांगोळी काढून केले माऊलीचे स्वागत दर्शन रांगेच्या बद्दला मुळे भक्ता मध्ये प्रंचड गोंदळ तुफान गर्दी पोलीस प्रशासनाचे दुलक्ष लोणंद प्रतिनिधी- अक्षय दोशी हरिनामाच्या जयघोषात आणि टाळ-मृदुंगांच्या गजरात गुरुवारी दुपारी दिड वाजता श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने निरा नदीकाठी पुणे जिल्ह्यातील आपला प्रवास संपवून निरा नदीवरील जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून मार्गक्रमण करत टाळ मृदुंगाच्या साथीत मोठ्या आनंदाने भक्तिमय वातावरणात सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. पालखी सोहळयाचे प्रवर्तक हैबतबाबांची भूमी असलेल्या सातारा जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर निरा नदीवरील माऊली भक्तांनी टाळ मृदुंगाच्या गजरात आणि माऊली माऊली च्या जयघोषात जलतुषार आणि फुलांच्या वर्षावात प्रसिद्ध दत्तघाट या ठिकाणी माऊलींच्या पादूकांना निरा स्नान घालण्यात आले. यावेळी सा...