शिवसेना व यशवंत आघाडीच्या पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन.*
शिवसेना नेते व यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष मा.राजेंद्रसिह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीने विचार विनिमय करण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्याच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात शिवसेना व यशवंत विकास आघाडीची कराड नगर परिषदेच्या निवडणुकीबाबत भुमिका ठरविण्यात येणार आहे.या मेळाव्याला शिवसेना जिल्हाध्यक्ष जयवंतराव शेलार नगरसेवक हणमंत पवार,विजय वाटेगावकर,प्रीतम यादव,निशांत ढेकळे,गजेंद्र कांबळे,ओमकार मुळे,बाळासाहेब यादव,राहुल खराडे,विनोद भोसले, किरण पाटील,माजी नगराध्यक्षा सौ.संगिता देसाई,आनंदराव देसाई, सचिन पाटील,विजयसिह यादव शहर प्रमुख राजेंद्र माने महिला आघाडी उपजिल्हा सुलोचना पवार चांदनी ताई पवार शिवसेनेचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
रविवार दि ९ नोव्हेंबर रोजी सायं.५ वा.सारडा लाॅन्स,पंतांचा कोट, सोमवार पेठ कराड येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment