Posts

मुबई माणसामाणसामध्ये विद्वेष वाढवणार्‍या ज्याप्रवृत्ती आहेत त्यांच्या हातामध्ये सत्ता जाणार नाही याची काळजी घेण्याचे जे आव्हान आहे त्या आव्हानाला सामोरे जाणे तुमचं - माझं कर्तव्यच नाही तर धर्म आहे - शरद पवार*

Image
*मुबई माणसामाणसामध्ये विद्वेष वाढवणार्‍या ज्याप्रवृत्ती आहेत त्यांच्या हातामध्ये सत्ता जाणार नाही याची काळजी घेण्याचे जे आव्हान आहे त्या आव्हानाला सामोरे जाणे तुमचं - माझं कर्तव्यच नाही तर धर्म आहे - शरद पवार* सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड 9156992811 रौप्यमहोत्सवी राष्ट्रवादी, विचार भविष्यवादी... आचार, विचार, निर्धार फक्त राष्ट्रवादी...*  *राष्ट्रवादीचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात उत्साहात साजरा...*  मुंबई दि. २१ जून - ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे उद्याच्या निवडणुकीत पुन्हा त्यांच्या हातात सत्ता आली तर चिंता वाढल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करतोय, पुढाकार घेतोय की देशातील लोकशाहीवर विश्वास असणार्‍या सर्व पक्षांना एकत्र करून देशातील सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करणारी जी लोकशाहीची व्यवस्था आहे त्या व्यवस्थेवर कुणी हल्ला करत असेल, तर त्या गोष्टी या देशात होऊ द्यायच्या नाहीत. लोक एकत्र करायचे, शक्ती उभी करायची आणि चुकीच्या, सांप्रदायिक जातीयवादी, माणसामाणसामध्ये विद्वेष वाढवणार्‍या ज्याप्रवृत्ती आहेत...

सातारा येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला

Image
सातारा येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला सातारा येथील पोलीस मुख्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगा विश्वविक्रमवीर डॉ जान्हवी इंगळे यांनी सर्वांना योगाचे मार्गदर्शन केले सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड 9156992811

श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून कराड नगरपालिका शाळेत 16 हजार मोफत वह्या वाटप सह्याद्री वार्ता न्यूज नेटवर्क कराड

Image

कराड उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कराडमध्ये गुरुवारी भव्य लाभार्थी संमेलन

Image
कराड उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कराडमध्ये गुरुवारी भव्य लाभार्थी संमेलन बुधवारी कराड मुक्कामी येणार; भाजपा कोअर कमिटीच्या बैठकीचे आयोजन कराड, ता. २० : भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्यावतीने देशभर महाजनसंपर्क अभियान राबविले जात आहे. या अभियानाअंतर्गत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस कराडच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (ता. २२) सकाळी ११ वाजता कराड येथे भव्य लाभार्थी संमेलन व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टीच्यावतीने महाजनसंपर्क अभियानाअंतर्गत देशभर मोदी सरकारच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविली जात आहे. या अभियानाअंतर्गत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस बुधवारी (ता. २१) रात्री कराड येथे मुक्कामी येणार आहेत. दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी (ता. २२) सकाळी १० वाजता कराड येथील शासकीय विश्रामगृहात भाजपाच्या जिल्हा कोअर कमिटीची बैठक ना. फडणवीस यांच्या प्रमुख उपस...

युवा नेते जशराज पाटील(बाबा) यांनी हणबरवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये वीणा घेवून केला टाळ मृदुंगाच्या गजरात हरी नामाचा जागर.*

Image
*युवा नेते  जशराज पाटील(बाबा) यांनी हणबरवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये वीणा घेवून केला टाळ मृदुंगाच्या गजरात हरी नामाचा जागर.* सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संचालक माननीय जशराज पाटील (बाबा) गेल्या १० वर्षांपासून आळंदीहून पंढरपूरला जाणाऱ्या श्री ज्ञानेश्वर माऊलीच्या दिंडीतून पायी वारी करतात, तथापि या वर्षी काही कामामुळे त्यांना या वारीमध्ये सहभागी होता आले नसल्याने, त्यांनी हणबरवाडी ता. कराड येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये परंपरागत वीणा घेवून  टाळ मृदुंगाच्या गजरात हरि नामाचा जागर केला. हणबरवाडी गावामध्ये १०० वर्षांपेक्षा अधिक काळापासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये अखंड हरिनामासाठी वीणा घेण्याची परंपरा सुरू असून, कोणत्याही परिस्थितीमध्ये वीणा खाली ठेवला जात नाही. गावातील ग्रामस्थांकडून हि परंपरा मोठ्या भक्ती भावाने जोपासली जात आहे. या गावाला सांप्रदायाची विशेष आवड असून, गावातील ग्रामस्थांकडून भजन, किर्तन, हरिपाठ, प्रवचन, हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. या सांप्रदायिक परंपरा जोपासणाऱ्या हणबरवाडी गावामध्ये ...

रिपोर्टर अक्षय दोशी लोणंद माऊलींच्या पादुकांचे दर्शन भाविकांची अलोट गर्दी हरिनामाच्या गजराने लोणंद नगरी दुमदुमली

Image
रिपोर्टर अक्षय दोशी लोणंद माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी लोणंदनगरीत भाविकांचा महापूर लोटला. माऊलींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. माऊलींचा पालखी सोहळा लोणंद नगरीत विसावल्यानंतर गेल्या दोन दिवसांमध्ये माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. लोणंदच्या पालखी तळावर महिला व पुरुष अशा चार रांगा लागल्या होत्या. नगरपंचायत व प्रशासनाच्यावतीने दर्शन रांगांमध्ये पाण्याची सोय तसेच दर्शन रांगांवर छताचे आवरण टाकण्यात आले होते. त्यामुळे अन्हापासून भाविकांचा बचाव झाला. माऊलींचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांच्या चेहच्यावर माऊलीच भेटल्याचे समाधान दिसत होते. माऊलींच्या बरोबरच माऊलींच्या रथाचे तसेच अश्वांचे भाविक दर्शन घेत होते. यावेळी माऊलींचा पालखीतळ वारकरी व भाविकांनी गजबजून गेला. दोन दिवसांच्या मुक्काम काळात संपूर्ण लोणंद नगरी हरीनामाच्या गजराने दुमदुमुन गेली होती. त्यामुळे अवध्या लोणंदनगरीला पंढरीचे स्वरूप आले होते. सुयोग ग्रुप मार्फत पंच महाजन मंगल कार्यालय येथे जेवणाच्या हजारो पंगती बसल्या होत्या   सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क ...

आदर्श संकुलनात श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा.*

Image
*आदर्श संकुलनात श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा.*         आदर्श प्राथमिक विद्यालय व शिशु विहारआगाशिवनगर मध्ये    श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचा ५० वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. श्री मळाईदेवी व ब्रह्मीभूत गंगाधर वासुदेव चैतन्य महाराज .यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.               श्री.सोपान जगताप यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले त्यांनी  श्री मळाई देवी शिक्षण संस्थेच्या स्थापनेपासून संस्थेच्या कार्यकर्तुत्वाची यशोगाथा विद्यार्थ्यांसमोर मांडली.       विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सचिन शिंदे यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच ध्यास घेऊन .संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेत .श्री मळाईदेवी शिष्यवृत्ती परीक्षा,  नॉनव्हेविकल डे ,पर्यावरण पूरक बिजारोपण, वृक्षारोपण ,प्रदूषण मुक्त दिवाळी, रक्तदान शिबिर .या उ...